Maharashtra Live News Update : मालेगावच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; विविध संघटनांचे बेमुदत उपोषण सुरू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरुवार, दिनांक १० जून २०२५, महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

मालेगावच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; विविध संघटनांचे बेमुदत उपोषण सुरू

नाशिकच्या मालेगाव शहरातील वाढत्या समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत तीव्र संताप असून, विविध सामाजिक संघटनांनी याविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले असून, भविष्यात आणखी तीव्र स्वरूप धारण करेल, असे संकेत आंदोलकांनी दिले आहेत.

गुरुपौर्णिमेला साई चरणी 65 लाख रुपये किमतीचे सोने चांदी, हिऱ्यांचे दान

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साई चरणी 65 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दान करण्यात आलंय.. यात 59 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट, 3 लाख रुपये किमतीचा सोने आणि हिरे जडीत आकर्षक ब्रोच तसेच 2 लाख 80 हजार रुपये किमतीचा चांदीचा हार अर्पण करण्यात आलाय.. वेगवेगळ्या दानशूर भाविकांकडून साई चरणी आज भरभरून गुरुदक्षिणा देण्यात आली आहे..

नाशिक : हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक जिल्ह्यातील मनमाड मध्ये ऐका हॉटेल बार मालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे,दारू उधार दिली नाही याचा राग मनात धरून दारू पिण्यासाठी आलेल्या दोघा तरुणां पैकी एकाने खिशातून सूरी काढत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला,सुदैवाने यात बारमालक थोडक्यात बचावले आहे,हॉटेल पंजाब मध्ये हा प्रकार घडला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे,दरम्यान हॉटेल मालकाने पोलिसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून या घटनेचा व्यापारी महासंघाने निषेध नोंदवत कडक कारवाईची मागणी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष यांची तक्रार

चेतन पवार या अर्जदाराने दिली गायकवाड यांच्या विरोधात तक्रार

संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

मनसेचा बच्चू कडूंच्या पदयात्रेला पाठींबा; बाळा नांदगावकर

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण अशी 138 किलोमीटरची पदयात्रा काढलीये.दरम्यान या पदयात्रेला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागणीला पाठींबा देण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होत पांठीबा दिला आणि सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं अस स्पष्ट मत त्यांनी यावेळी बोलून दाखविल.

श्री क्षेत्र नारायणपूर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त लाखो भक्तांची दर्शनासाठी उपस्थिती

श्री क्षेत्र नारायणपूर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त भक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने हजेरी लावली. योगीराज सद्गुरु श्री नारायण महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आज लाखो भक्तांनी भेट दिली. पहाटेपासूनच नारायणपूर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेला होता.या दिवशी विशेष पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. मंदिर समिती, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवक यांनी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करत शांततेत कार्यक्रम पार पाडला.गुरु पौर्णिमा हा दिवस अध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नारायणपूर येथील गुरु पौर्णिमा उत्सव राज्यातील एक प्रमुख अध्यात्मिक कार्यक्रम मानला जातो.

शेतकऱ्यांवर गव्याचा प्राणघातक हल्ला; दोन जण गंभीर जखमी

शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या पाच शेतकऱ्यांवर गव्याचा प्राणघातक हल्ला : दोन जण गंभीर जखमी

कोल्हापुरच्या पाटपन्हाळा इथं घडली घटना

जखमींवर बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू तर गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू

बुधवारी सकाळी वैरण काढत असताना अचानक गव्यांचा दोन शेतकऱ्यांवर हल्ला तर इतर पळून जाताना पडल्याने जखमी

दत्तात्रय राघू गुरव यांच्या डोक्याला गव्याच्या शिंगाचा तर बंडोपंत पाटील यांना गव्याच्या पायाचा मार लागलाय

परिसरात भितीचे वातावरण : वारंवार गव्याच्या हल्ले होत असल्याने शेतकरी हतबल ,शिवाय ऊस पिकांच मोठं नुकसान

तर पाटपन्हाळा इथं गव्याच्या हल्ल्यांत आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

राज ठाकरे मिरारोडच्या दौऱ्यावर जाणार

मनसे प्रमुख राज ठाकरे मिरारोडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी झालेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे १८ जुलैला दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे.

राज ठाकरे मीरारोडच्या दौऱ्यावर जाणार

बीडच्या सोनदरा गुरुकुल मध्ये अनोखी गुरू पौर्णिमा

बीडच्या सोनदरा गुरुकुल मध्ये अनोखी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. निसर्ग हा सर्वांचा गुरू आहे. त्याची पूजा करून सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी 200 झाडांची लागवड केली. तसेच मागच्या वर्षी लावलेल्या 600 झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.. याच बरोबर आज सत्यनारायणाच्या धर्तीवर सत्यवृक्ष पूजा नव्याने सुरू करण्यात आली. यात आयुर्वेदातील मंत्र, कथा आणि पूजेची अनोखी मांडणी करण्यात आली.

कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी

कल्याणमध्ये डेंग्यूने पहिला बळी घेतला आहे. विलास म्हात्रे असे मृत व्यक्तीचे नाव असून, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचे एकूण ३५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहापूरच्या प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल

शहापूरमधील एका शाळेमध्ये स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह अशी शारीरिक तपासणी केल्याची घटना घडली. मासिक पाळीला सामोरे जात असताना मुलींच्या शरीरात, मनात होणारे बदल यात त्यांची मानसिकता संवेदनशील असताना त्यांची तपासणी केली.

घडलेला प्रकार संतापजनक आहे. शाळेचे विश्वस्, मुख्याध्यापिका, महिला सफाईगार यांच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका व महिला सफाईगार यांना अटक करण्यात आली असून विश्वस्त आणि या घटनेशी संबंधित चार शिक्षिका यांची पोलिस चौकशी सुरू आहे.

राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, ठाणे यांचेकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल मागवला आहे. तसेच शिक्षण, उपसंचालक यांनाही त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बऱ्हाणपूर अक्कलकुवा बस अडकली चिखलात..

जिल्ह्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याचा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागत आहे. प्रवाशांनी भरलेली बस चिखलात अडकल्याने प्रवाशांना भर पावसात दुसऱ्या बसची वाट बघत नाहक त्रास सहन करावा लागला आहे. बऱ्हाणपूर अक्कलकुवा बस क्रमांक एम एच 20 बी एल 1599 ही बऱ्हाणपूर हून अक्कलकुवा शहादा मार्गे जात असताना शहादा तालुक्यातील होळ उंटावद गावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल साचला असल्याने बस चिखलात अडकली. यामुळे बस मागेही होईना अनपुढेही जाईना प्रवाशांना बराच काळ बस मध्ये अडकून बसावे लागले. बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे बाहेरही निघता येईना. बऱ्याच काळानंतर शहादा बसागरातून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. परंतु तोपर्यंत प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहादा तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आजोबांनंतर माझे राजकीय गुरू देवेंद्र फडणवीस - सुजय विखे

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.. दर्शनानंतर विखे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील दोन गुरुंचा उल्लेख केला.. आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे नेहमीच माझे गुरू राहिले आहेत.. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरू असून त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिलीये..

कोथरूडमध्ये रस्ता खचला, ट्रक फसला

पुणे महानगरपालिकेचा अजून एक ढिसाळ कारभार खड्डा खोदून काढला व परत निट बुजवला नाही, रस्ता खचल्यामुळे संपूर्ण ट्रक खाली गेला असुन मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाला आहे, पुणे महापालिकेने आता टॅक्स घेणं बंद केलं पाहिजे आणि रस्ते सुधारले पाहिजेत.

भंडारा बायपास महामार्गाच्या कडा पुन्हा कोसळल्या

भंडारा शहरातील वाहतूककोंडी दूर करण्याकरिता तब्बल ७३५ कोटी रुपये खर्च करून १५ किलोमीटरचा बायपास महामार्ग तयार करण्यात आला. या बायपास महामार्गाचे ५ जुलैला केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. मात्र, मागील चार दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत वैनगंगेच्या नदीवरील पुलालगतच्या महामार्गाच्या कडा कोसळल्यात. उद्घाटनाच्या पूर्वी याच भागातील कडा मुसळधार पावसात कोसळल्या होत्या. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्याचं भागातील कडांसह बायपास महामार्गावरील शिंगोरी भागातीलही कडा आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी कठडेही पूर्णपणे कोसळले आहे.

गणेशोत्सव 'महाराष्ट्राचा उत्सव' म्हणून घोषित

आशिष शेलार

बऱ्हाणपूर अक्कलकुवा बस अडकली चिखलात

जिल्ह्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याचा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागत आहे. प्रवाशांनी भरलेली बस चिखलात अडकल्याने प्रवाशांना भर पावसात दुसऱ्या बसची वाट बघत नाहक त्रास सहन करावा लागला आहे. बऱ्हाणपूर अक्कलकुवा बस क्रमांक एम एच 20 बी एल 1599 ही बऱ्हाणपूर हून अक्कलकुवा शहादा मार्गे जात असताना शहादा तालुक्यातील होळ उंटावद गावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल साचला असल्याने बस चिखलात अडकली.

पुण्यातील दारूवाला पुलाजवळील ड्रेनेज काम सुरू असताना खांब कोसळला

हा काम शाळकरी मुलीच्या डोक्यात पडून मुलगी जखमी

पुण्यातील कसबा पेटीतील घटनेने खळबळ

जखमी झालेल्या मुलीवर उपचार सुरू

चांदवडच्या राहूड घाट परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक च्या चांदवड तालुक्यातील राहूडगाव,कळंमधरी आणि घाट परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याला जे्रबंद करण्यात वन विभागाला यश आले असून,एका पोल्ट्री फार्म जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आज सकाळी अडकला. गेल्या आठवड्या या बिबटयाने एका महिलेवर हल्ला करून तीला गंभीर जखमी केले होते शिवाय काही जनावरांचा देखील बळी घेतला होता त्यामुळे ग्रामस्थ भयभीत होते, मात्र आज बिबट्याला पकडण्यात आल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला

मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वरचा प्रवास रामभरोसे

डोंगर खुदाईच्या ठिकणी संरक्षक भिंती नाहीत..

कधीही मोठमोठ्या दरडी रस्त्यावर येण्याचा धोका...

जीव मुठीत धरून वाहनधारकांचा प्रवास..

अवघड वळणावर अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने दरडी कोसळण्याचा धोका

संगमेश्वरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सर्वाधिक धोका

संरक्षक भिंत नसल्याने दरड कोसळून रस्त्यावर येऊ शकते

या दरडीमुळे महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम होऊ शकतो

Junnar: किराणा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या आरोपीला अटक

आळेफाटा चौकातील किराणा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा आळेफाटा पोलीसांनी पर्दाफाश करत एका आरोपीला बीड जिल्ह्यातुन अटक करत चोरीच्या मालासह दोन गाड्या असा ११ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी आरोपीने चोरीच्या गुन्हाची कबुली दिली आहे

Jalgaon: गुरुपौर्णिमेनिमित्त यावल येथील महर्षी व्यास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जात असून गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक यावल येथे महर्षी व्यासांच्या दर्शनासाठी आले आहेत. देशभरात महर्षी व्यासांचे तीन ठिकाणी मंदिर असून यावल येथील व्यासांचे मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचा शास्त्र पुराणात उल्लेख असून महाभारतातील काही ओव्या महर्षी व्यासांनी याच ठिकाणी रचल्याची आख्यायिका असून गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यासांच्या दर्शनाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली, शेतकरी पुन्हा संकटात

भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली बुडालेले आहेत व जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपालाची शेती करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच धानाच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झालेले धान सुद्धा वाहून गेले आहेत. अनेक धुरे वाहून गेले आहेत. त्यांची तलाठी विभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

मिरजेत 55 वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी दाखवले मराठी भाषेचे प्रेम

सांगलीच्या मिरजेत गेले 55 वर्षे स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी मिरजेत आपल्या मराठी भाषेचे प्रेम दाखवले. पंजाबी असून सुद्धा आम्ही महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मिरजेत 1970 पासून आमच्या वडिलांपासून आम्ही स्थायिक झालो आहोत. त्यामुळे आम्ही घरी सुद्धा मराठीच बोलतो आणि बाहेर सुद्धा मराठीच बोलतो, त्यामुळे आम्हाला मराठीत असल्याचा अभिमान आहे.

Sangli: बेंदूर सणानिमित्त प्रसिद्ध गज्या बैलाच्या सांगाड्याचा मिरवणूक

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज मध्ये बेंदूर सणानिमित्त एका मेलेल्या बैलाच्या

सांगाड्याचा मिरवणूक सोहळा पार पडला.

हा भारतातील सर्वात मोठा बैल म्हणून ओळख मिळवलेल्या गज्या बैलाच्या मृत्यू पश्चात त्याच्या सांगड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा बेंदूर सणानिमित्त पार पडला.

या गज्या बैलाने बेंदूर सणाला भारतामधील, महाराष्ट्रातील, सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज चे नावलौकिक केले होते.

त्यामुळे महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या निमित्ताने आणि गज्या बैलाच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून या गज्या बैलाच्या सांगड्याचा मिरवणूक सोहळा कसबे डिग्रज गावामध्ये पार पडला.

साईबाबा आमचे गुरू "श्रध्दा सबुरी आणि सबका मालिक एक" हा गुरुमंत्र, साईभक्तांच्या प्रतिक्रिया

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.. साईबाबांना गुरू मानणारे लाखो भाविक आज साई चरणी नतमस्तक होत आहेत.. साईबाबा हेच आमचे गुरू असून त्यांनी दिलेला " श्रध्दा सबुरी आणि सबका मालिक एक " हा गुरुमंत्र जीवनाला दिशा देणारा असल्याच्या भावना साईभक्तांनी व्यक्त केल्यात..

नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गाचीअत्यंत दुरावस्था

तळोदा अक्कलकुवा या दोन तालुक्यातून गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे.....

नेत्रंग शेवाळे महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज होतात अपघात....

महामार्गावर असलेल्या अनेक फुलांचे संरक्षण कठळे तुटल्याने जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास.....

रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला भाजप नेत्यांचे पत्र...

महामार्गावरील खड्डे लवकरच दुरुस्त ने केल्यास भाजप नेते नागेश पाळवींचा आंदोलनाचा इशार

कल्याण डोंबिवलीत डेंगू मलेरियाचा धोका वाढला

कल्याण डोंबिवलीत डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. मेपासून आतापर्यंत डेंगूचे तब्बल ३५ रुग्ण आढळून आले आहेत. तर फक्त जून महिन्यात ४१ आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात १८ मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. केडीएमसीचे आरोग्य विभाग घरोघरी सर्वेक्षण आणि औषध फवारणीसह विविध उपाय योजना करत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान आरोग्य विभागाकडून केले जात आहे

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

24 तासात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाने नुकसान

550 हेक्टर शेती पिकांचे नुकसान तर 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली..

मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे घराची भिंत अंगावर पडल्याने ३ वर्षीय बालक स्वरुप गांजरे याचा मृत्यू तर त्याच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला रेखा गांजरे या गंभीर जखमी

55 घरांची पडझड, गेल्या तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरूच

अहिल्या नगरच्या दोन भाविकांकडून  विठ्ठलचरणी एक कोटीचा चांदीचा दरवाजा भेट

अहिल्यानगर येथील अतुल पारे व गणेश आव्हाड या भाविकांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा 87 किलो चांदीचा दरवाजा विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी हे दान देवाला दिले आहे

Chhatrapati Sambhaji Nagar: यशवंत विद्यार्थी योजना केवळ कागदावर दिसते, समाज कल्याण विभाग काय कारवाई करणार?

यशवंत विद्यार्थी योजना केवळ कागदावर दिसत आहे,

प्रत्येक विद्यार्थ्यांमागे 70 हजार रुपये लाटले धनगर समाजाची यामुळे मोठी फसवणूक झाल्याचे समोर येत आहे,

धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाबरोबरच वसतिगृहाची सोया व्हावी म्हणून यशवंत विद्यार्थी योजना सुरू करण्यात आली होती

राज्यातील या शाळांची सखोल चौकशी होण्याची गरज

समज कल्याण विभाग या संदर्भात काय कारवाई करणार का

Dhule: मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोड रोमियोना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला चांगला चोप

धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथे दोघेजण मुलींची छेड काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले घटनास्थळी

संबंधित रोड रोमिओ घटनास्थळावरून झाले होते पसार

शिवसैनिकांनी त्यांचा शोध घेत त्यांची गली नंबर चार येथेच चांगला चोप देत घेतला समाचार

त्यानंतर या रोडरोमोयोंना केले पोलिसांच्या स्वाधीन

Godavari: गोदावरीचा पूर काही प्रमाणात ओसरला, मात्र पूरसदृश्य परिस्थिती कायम

- पावसाचा जोर कमी झाल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

- सद्यस्थितीत गंगापूर धरणातून १७६४ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

- दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणी पातळीत घट

- रामकुंड आणि गोदाघाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम

- मात्र पुराची पाणी पातळी कमी झाल्यानं रामकुंड आणि गोदा घाटावरील जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येण्यास सुरुवात

दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के

दिल्लीत आज भूकंपाचे धक्के जाणवले आहे. १० सेकंद दिल्ली हादरली होती. ९ वाजून ४ मिनिटांनी हे धक्के जाणवले होते. नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली या ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.

Jalna: जालन्यात चक्क बँकेतून दोन लाख तीस हजारांची बॅग पळवली

जालन्यात चक्क बँकेतून दोन लाख तीस हजार रुपयांची बॅक दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. बँकेत पैसे भरत असताना बाजूला ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपयांची बॅक दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेतून चोरून नेली आहे. जालन्यातील अंबड येथील एसबीआय बँकेत काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी रामेश्वर बारहाते यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत..

Akkalkot: गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी

स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांच्या लागल्या आहेत रांगा

महाराष्ट्रासह,तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोट नगरीत झाले आहेत दाखल

त्यामुळे पहाटेपासून अक्कलकोट परिसरात अतिशय भक्तीमय वातावरणात स्वामी भक्तांना लागली आहे दर्शनाची आस..

या सर्व परिस्थितीचा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी

Pune: पुणे महापालिकेच्या मैदानावर यंदा वादन पथकाला परवानगी नाही

महापालिकेकडे आलेले सगळे प्रस्ताव महापालिकेने नाकारले

मोकळी उद्याने आणि क्रीडांगणे या ठिकाणी ढोल ताशा पथकाकडून परवानगी मागितली जाते

मात्र आता खेळाडूंना होणार त्रास लक्षात घेता क्रीडांगणावर परवानगी नाही

आलेले प्रस्ताव महापालिकेने नाकारले

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा

- उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार

- जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता

- मतदारसंघ निहाय घेणार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे साधणार संवाद

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार

- नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार

- नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरले अवघे ४ माजी नगरसेवक आणि मोजके पदाधिकारी

- ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा

- या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलसाठी नाशिक दौरा

एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट, सेटमधून सूट

राज्यातील एक हजार ४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा

दीर्घकाळ सेवेत असूनही राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांना या अर्हतेचा लाभ गेल्या २५ वर्षांपासून मिळत नव्हता

आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पात्रता धारक प्राध्यापकांना त्या अर्हतेचा लाभ देण्याचा प्रश्न निकाली काढला आहे

राज्यातील एक हजार ४२१ प्राध्यापकांना एम.फिल अर्हतेच्या तारखेपासून नेट/सेट परीक्षेतून सूट देण्यास आयोगाने अखेर मान्यता दिली आहे

गडचिरोली आणि नागपूर येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला

- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडचिरोली आणि नागपूर येथे 2 हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज

- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला

- नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची चमू सज्ज ठेवण्यात आली आहे

- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

Maharashtra Live News Update : शिर्डीमध्ये गुरूपोर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

साई मंदिराचे दर्शन कॉम्प्लेक्स हाऊसफुल...

नगर मनमाड महामार्गावर तिन ते चार किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा...

दर्शनासाठी लागतायत चार ते पाच तास...

संस्थान सुरक्षा रक्षकांची मोठी दमछाक...

साईनामाचा जयघोषात भाविक होतायत साईचरणी नतमस्तक...

उत्सवानिमीत्त आज साई मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार रात्री आठ वाजता जाहीर करण्यात आल्या

परिषदेच्या 'www.mscepune.in' व 'https://puppssmsce.in' या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एक लाख ३० हजार ८४६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असून त्यातील १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले

इयत्ता आठवीतील ७० हजार ५७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असून त्यातील १५ हजार ९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत

राज्य परीक्षा परिषदेतर्फे नऊ फेब्रुवारी रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील पाच लाख ४७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख ६५ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

सरकारी कार्यालयात बर्थडे साजरे केले तर थेट कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी कार्यालयात बर्थडे साजरे केले तर थेट कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व सरकारी विभागांसाठी एक परिपत्रक काढले आहे. जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सर्रासपणे अधिकारी-कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. नागरिकांना बाहेर ताटकळत ठेवून आत केक कापला जातो. परंतु यापुढे सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. जिल्ह्यात महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महावितरण, जलसंपदा, जलसंधारण, सिडको, नगर परिषदा, पोलिस, सार्वजनिक आरोग्य, पशूसंवर्धन विभाग, शिक्षण, सहकार, समाजकल्याण अशा विविध सरकारी खात्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये कामानिमित्त दररोज असंख्य नागरिक येत असतात. परंतु काही वेळा कार्यालयीन वेळेतच अधिकारी कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. केक कापला जातो. तोपर्यंत नागरिकांना बाहेर ताटकळत थांबावे लागते. नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा इतर प्रकारचे उत्सव साजरे करता येत नाहीत. तरीदेखील या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता बर्थ डे साजरे करताना आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात रात्री पावसाची उसंत

चंद्रपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यात काल रात्री पावसाने उसंत दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि गेले दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सव्वा तीनशे मिलिमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र काल रात्री पाऊस न झाल्याने आता फक्त गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यास पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ शकते.

आषाढीवारी काळात 10 लाख भाविकांचे विठ्ठल दर्शन

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली आहे. 4 लाख 54 हजार भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहून देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले तर 5 लाख 47 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. अजून ही हजारो भाविक दर्शन‌रांगेत उभे आहेत. आज गोपाळकाल्याने आषाढीची सांगता होणार आहे. सर्व संतांच्या पालख्या देवाच्या भेटीला जाणार आहेत. संत आणि देव भेटी नंतर दुपारी पालख्या परतीच्या प्रवासाला निघतील.

गुरु पौर्णिमे निमीत्त गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

गुरु पौर्णिमे निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात असंख्य भाविकांनी गर्दी केलेली आहे.. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असताना सुद्धा भाविक शेगावात दाखल झाले आहे.. आज सकाळपासूनच शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्याच्या काण्या कोपऱ्यातून हजारो दर्शनासाठी पोहोचले आहेत... तसेच शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून सुद्धा असंख्य भाविक शेगावात दाखल झाले आहेत्

Maharashtra Live News Update : धक्कादायक! सहा महिन्यांत पश्चिम विदर्भात ५२७ शेतकऱ्यांची आत्महत्या

पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती, यवतमाळ,वाशिम, बुलढाणा आणी आकोला या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे.यंदा सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १७८ आत्महत्या आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.नैसर्गिक आपत्ती,नापिकी, दुष्काळ,बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा,मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे.यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल ५२७ शेतकरी आत्महत्या झाल्या

भंडाऱ्यात आज शाळांना दिली आज सुट्टी

भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय.तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. परिणामी, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील जवळपास 90 मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

साईंच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह

शिर्डीच्या साई मंदिरात साजरा केल्या जाणाऱ्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे.. आज सकाळपासून साई समाधीसह गुरुस्थान मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.. साईबाबांना गुरुस्थानी मानून दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात.. आज देखील सकाळपासूनच भाविकांचा मोठा उत्साह दिसून येतोय.. साई समाधी मंदिरासह परिसरातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.

 गडचिरोलीत वाहनांच्या लागल्या रांगा

मागील चोवीस तासांपासून ब्रम्हपुरी गडचिरोली मार्ग बंद असल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. वाहनांच्या लांब रांगा ब्रम्हपुरी शहरात कालपासून बघायला मिळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. इथून गडचिरोलीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला वडसा आणि दुसरा आरमोरी मार्ग आहे. मात्र संततधार पावसाने हे दोन्ही मार्ग भूती नाल्याला पूर असल्याने बंद आहेत. त्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूक करणारी सर्व वाहने जागच्या जागी आहेत. लांबचलांब रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागल्या आहेत.

वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे पोलिस दलातील वाहतूक विभागातील कर्मचारी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

धनाजी भरत वणवे असे पोलिस कर्मचारी यांचे नाव आहे

काल संध्याकाळी ड्युटी करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला

वणवे भारती विद्यापीठ विभागाच्या वाहतूक विभागात कार्यरत होते

काल संध्याकाळी पावणे ७ वाजण्याच्या वणवे यांचे कात्रज मंडई चौकात कर्तव्यावर असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तत्काळ साई स्नेह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचे तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले चे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले

त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी मुलगी व मुलगा शिवराज असा परिवार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com