Rubina Dilaik On Car Accident Saam TV
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik Reaction On Car Accident: 'अपघातामुळे माझ्या डोक्याला दुखापत...' कार अपघातानंतर रुबिना दिलैकची धक्कादायक प्रतिक्रिया

Rubina Dilaik Share Tweet: अभिनेत्रीने ट्विट करत अपघातानंतर तिची प्रकृती कशी आहे हे सांगितले आहे.

Pooja Dange

Rubina Dilaik On Car Accident : टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकचा कार अपघात झाला आहे. तिचा नवरा आणि अभिनेता अभिनव शुक्लाने ट्विट करत याविषयी माहिती देती होती. तसेच मुंबई पोलिसांना देखील या ट्विटमध्ये टॅग केले होते.

या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत. आता या अपघातांवर अभिनेत्री रुबिना दिलैकची प्रतिक्रिया आली आहे. अभिनेत्रीने ट्विट करत अपघातानंतर तिची प्रकृती कशी आहे हे सांगितले आहे.

रुबिना दिलैकचे ट्विट

रुबिनाने ट्विट करत म्हटले आहे की, 'अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सध्या मी शॉकमध्ये आहे. पण आम्ही वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत, सर्व काही ठीक आहे... निष्काळजी ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई झाली असली तरी नुकसान झाले आहे.

मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमच्या आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळा!'रुबिनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने पत्नीच्या कारचा अपघात कसा झाला, याची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

रुबिनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने पत्नीच्या कारचा अपघात कसा झाला, याची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

अभिनवने एक ट्विट शेअर केले आहे. संताप व्यक्त केला आहे. ट्विट करत अभिनवने गाडी चालवताना फोन वापरणाऱ्या किंवा फोनवर बोलणाऱ्या सर्व लोकांना चांगलेच सुनावले आहे.

अभिनव शुक्लाने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आमच्यासोबत हे घडले आहे, ते कुणासोबतही होऊ शकते. ट्रॅफिक लाइटवर लक्ष न देता सिग्नल तोडणाऱ्यांपासून सावधान.

त्यात भर म्हणजे इतके करूनही वेड्यासारखे आपल्याकडे हसतात.' पुढे रुबिनाच्या हेल्थ अपडेट देताना त्यांनी लवकरच संपूर्ण माहिती देणार असल्याचे लिहिले. रुबिना गाडीतून प्रवास करत होती, ती ठीक आहे. तिला मेडिकलसाठी घेऊन जात आहे.

एवढेच नाही तर अभिनवने मुंबई पोलिसांना टॅग करत दोन गाड्यांचे फोटोही शेअर केले आहेत आणि पोलिसांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.

मात्र, या घटनेनंतर रुबिनाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर दुसरीकडे रुबिनाचे चाहते ती लवकर बारी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. ताईच त्यांना तिच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे.

रुबिना बॅक-टू-बॅक रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. आता तिचे फॅन्स तिला मालिकेत काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT