Riteish Deshmukh wishes Wife Genelia Deshmukh Wishes Birthday Instagram
मनोरंजन बातम्या

Genelia Deshmukh Post: 'माझी बायको, माझं वेड!' रितेशने जिनिलियाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Riteish Deshmukh Wish Genelia Deshmukh: रितेश देशमुखने लाडक्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Genelia Deshmukh Birthday News: रितेश- जिनिलिया मराठीसह बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. आज जिनिलिया तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. खास लाडक्या पत्नीसाठी अभिनेता रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर केली आहे. लाडक्या पत्नीच्या वाढदिवशी अभिनेत्याने खास पोस्ट पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलियाचा आज ३६वा वाढदिवस आहे. जिनिलियाने टॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केलं. रितेश जिनिलियाची पहिली भेट ही 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून झाली होती. या दोघांचाही हा पहिलाच एकत्र चित्रपट होता. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. रितेश-जिनिलियाची ही क्यूट लव्ह स्टोरी त्यांच्या चाहत्यांना माहित आहे. एकमेकांचे कौतुक करण्याकरिता हे दोघे एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच रितेशने खास पत्नीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. (Bollywood)

रितेशने पत्नी जिनिलियासोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. अभिनेता पोस्टमध्ये म्हणतो, “माझ्या बेस्ट फेंडसाठी, माझा सर्वात मोठा पाठिंबा, माझा क्राईम पार्टनर, माझी सर्वात मोठी चिअरलीडर, माझं आयुष्य सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल थँक्यू. माझी बायको... माझं वेड लव्ह यू” अशी पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.

या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या पोस्टवर जिनिलियाच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “नवरोबा तू माझे संपूर्ण आयुष्य आहेस. मी तुझ्याशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही.” अशी कमेंट जिनिलियाने केली आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलियाच्या वर्कफ्रंटद्दल बोलायचे तर, जिनिलिया खूप वर्षानंतर 'वेड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपटात जिनिलिया अस्खलित मराठी बोलली आहे. रितेश जिनिलियाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT