Shailesh Lodha News
Shailesh Lodha NewsSaam Tv

Shailesh Lodha News: अखेर 'तारक मेहतां'नी जिंकला खटला; असित मोदी यांना शैलेश लोढांना द्यावे लागणार इतके कोटी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest News: काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर थकबाकी न दिल्याबद्दल एक खटला दाखल केला होता. तो खटला आता ते जिंकले आहेत.
Published on

Shailesh Lodha News: टेलिव्हिजन सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून कमालीची चर्चेत आहे. सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये अग्रस्थानी राहिलेल्या या मालिकेला १५ वर्ष पुर्ण झाले आहेत.

अनेक कलाकारांनी मालिकेला सोडचिट्ठी देत काढता पाय घेतला. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे, शैलेश लोढा. शैलेश लोढाने मालिकेत तारक मेहतांचे पात्र साकारले होते. मालिकेत शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली.

दरम्यान, शैलेश लोढा संबंधित एक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर थकबाकी न दिल्याबद्दल एक खटला दाखल केला होता. तो दाखल केलेला खटला ते जिंकले असून त्यांच्या खटल्याचा निकाल मे महिन्यात आला.

Shailesh Lodha News
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं नाटक; अनुभव शेअर करत म्हणाली...

‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, शैलेश लोढा यांनी एप्रिल २०२२ मध्ये मालिका सोडली आहे. मालिकेच्या निर्मात्यांविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय शैलेश लोढाच्या बाजूनेच लागला. मे २०२३ मध्ये त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

निर्मात्यांनी शैलेश लोढा यांना सेटलमेंट अटींनुसार १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे द्यावे लागणार आहेत. या प्रकरणाची ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली असून दोन्ही पक्षकारांच्या वकिलांच्या माध्यमातून सेटलमेंट करण्यात आली आहे. (Serial)

एप्रिल २०२२ मध्ये शैलेश लोढाने मालिका सोडली होती. या वर्षी शैलेश लोढा यांनी वर्षभर थकलेल्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) सोबत संपर्क साधला. दिवाळखोरी संहितेच्या कलम ९ अंतर्गत संबंधित प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. 'दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी संमतीच्या काही अटींनुसार निकाल काढला.' (Actors)

Shailesh Lodha News
Mumbai Crime News: धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार; मुंबईतील घटना

‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, अभिनेत्यासोबत ज्यावेळी संपर्क साधला तेव्हा त्याने एनसीएलटीचे आभार मानले. सोबतच तो पुढे म्हणाला, “माझी ही लढाई कधीच पैशांसाठी नव्हती. न्याय आणि स्वाभिमान मिळविण्यासाठी मी ही न्यायाची लढाई लढलो. मला असं वाटतं की मी एक लढाई जिंकलीय. मला सत्याचा विजय झाल्यामुळे आनंद झाला आहे.”

तर पुढे मुलाखतीत शैलेश लोढा म्हणतो, “माझे थकलेले पैसे पूर्ण करण्यासाठी मी काही कागदपत्रांवर सही करावी अशी त्याची इच्छा होती. मी माध्यमांसोबत काही गोष्टींसंबंधित बोलू शकत नाही, अशी काही कलमं त्यात होती. पण मी त्यावर सही केली नाही. माझे स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदपत्रांवर सही का करू?” असं त्यांनी नमूद केलं.

Shailesh Lodha News
Kokan Hearted Girl New Song Teaser: कोकण हार्टेड गर्ल अंकिता दिसणार नव्या भूमिकेत; लवकरच झळकणार ‘या’ म्युझिक व्हिडीओमध्ये

शैलेश लोढा यांनी पुढे सांगितले, त्यांच्या लढ्याने शोचा भाग असलेल्या दुसर्‍या कलाकारांना कशी मदत केली आहे."मला नाव सांगायचे नाही. एका अभिनेत्याला गेल्या वर्षांपासून अधिक काळ पगार मिळालेला नाही. मी खटला दाखल केल्यानंतर, त्यांना प्रॉडक्शन हाऊसने बोलावले आणि त्यांची थकबाकी दिली. त्याबद्दल त्याने माझे आभार ही मानले." शैलेश, हे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com