Raja Shivaji - Abhishek Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji - Abhishek Bachchan : 'राजा शिवाजी' VFX वरून ट्रोल; अभिषेक बच्चननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- "रितेश देशमुख..."

Abhishek Bachchan talk on Raja Shivaji VFX Criticism : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. मात्र चित्रपटाला VFX वरून ट्रोल केले गेले. त्यावर अभिषेक बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' ला VFX वरून ट्रोल करण्यात आले.

अभिषेक बच्चनने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना दुसरीकडे काही प्रमाणात चित्रपटाला 'VFX' (व्हिज्युअल इफेक्ट्स) ट्रोल केले जात आहे. व्हिज्युअल इफेक्ट्सवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही लोक व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक करत आहे, तर काही लोक ट्रोल करत आहे. आता यावर 'राजा शिवाजी' चित्रपटात संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारलेला बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी मौन सोडले आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

अभिषेक बच्चनने न्यूज 18 शी साधलेल्या संवादात सांगितले की, "अनेकदा 'बजेट'ही एक मोठी मर्यादा ठरते. कदाचित सामान्य माणसाला याची कल्पना नसेल, पण VFX ही एक अत्यंत नाजूक आणि कलात्मक गोष्ट आहे. मात्र ती पूर्णपणे उपलब्ध संसाधनांवर आणि बजेटवर अवलंबून असते. तुम्ही त्याला जितका जास्त वेळ द्याल, तितके ते अधिक चांगले दिसेल. तुम्ही तुमच्या VFX साठी जितका जास्त पैसा खर्च कराल, तितका त्याचा दर्जा उंचावेल. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, शेवटी रितेश आणि जिनिलिया यांनी अत्यंत मर्यादित बजेटमध्ये हा मराठी चित्रपट बनवला आहे."

पुढे अभिषेक म्हणाला की, "तुमचे स्टुडिओ कदाचित असे म्हणतील की, 'या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आम्ही तुम्हाला हजार कोटी रुपये देणार नाही, कारण सध्याची बाजाराची स्थितीच तशी आहे.' परंतु, ज्या चित्रपटाचे VFX साठीचे बजेट १,००० कोटी रुपये असते तो चित्रपट ज्याचे बजेट त्या तुलनेत खूपच कमी असते अशा चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा दिसतो. या क्षेत्राचे कामकाज चालतेच मुळात अशा प्रकारे. आपल्याला इतरांवर टीका करायला किंवा त्यांना पारखायला खूप आवडते; पण ही संपूर्ण यंत्रणा नेमकी कशी काम करते, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे..."

शेवटी अभिषेक म्हणाला की, "आपल्याकडील VFX च्या कामाची तुलना लोक अनेकदा हॉलिवूडमधील कामाशी करतात. पण त्यांच्याकडे प्रचंड बजेट उपलब्ध असते. तुम्हाला याच्या व्याप्तीची कल्पना यावी म्हणून सांगतो- चित्रपटाच्या एकूण बजेटचा विचार बाजूला ठेवला तरी, केवळ VFX वरच ते कदाचित ५००० कोटींहून अधिक रक्कम खर्च करत असतील. आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. आपले मार्केट त्या स्वरूपाची नाही. आपण VFX च्या कामासाठी त्यांच्या तुलनेत कदाचित केवळ एक टक्काच वेळ आणि संसाधने खर्च करू शकतो. हे सर्वस्वी तुम्ही किती पैसा गुंतवू शकता, यावर अवलंबून असते." यासोबतच अभिषेक बच्चनने रितेशच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा वाद पेटला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर शाईफेक, कारण काय?

SSC Result : दहावीच्या निकालाचा धक्का, कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थ्यांची आत्महत्या

नाशिक पिंपरी चिंचवडमध्येही CNG चे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागतील?

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे मोठी वाहतूक कोंडी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी, सिनेविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT