Kantara Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्यानंतर 'कांतारा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार

‘कांतारा’ हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर असून चित्रपट एका पारंपारिक संस्कृतीवर आधारित आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर भरघोस गल्ला जमतो. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटाची भूरळ बऱ्याचदा हॉलिवूड कलाकारांनाही पडलेली आपण पाहिले आहे. बॉलिवूडलाही मागे टाकत सध्या भारतीय चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा चांगलाच बोलबाला होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. (Marathi Entertainment News)

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम भाषेत प्रदर्शित होणार असून चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षक अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर चित्रपट पाहू शकणार आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ओटीटीवर चित्रपट पाहता येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. ‘कांतारा’ हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर असून चित्रपट एका पारंपारिक संस्कृतीवर आधारित आहे. कांबळा आणि बुटा कोलाच्या पारंपारिक संस्कृतीतील उत्सवावर चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. यात ऋषभच्या दुहेरी भूमिका आहेत. अनेकांनी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे.

केजीएफचे निर्माते होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगंडूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी असेही सांगितले की चित्रपटाची हिंदी आवृत्ती संपूर्ण भारतात ८०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल. चित्रपटात मुख्य भूमिकेत किशोर, अच्युथ कुमार, प्रकाश थुमिमाड, प्रमोद शेट्टी आणि नवीन डी पडिल कलाकार आहेत. चित्रपटाला संगीत अजनीश बी लोकानाथ यांनी दिले असून चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी केएम प्रकाश यांच्या खांद्यावर होती. तर चित्रपटाचे संकलन प्रतिक शेट्टींनी केले आहे. चित्रपटाने आठवड्याभरात ५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT