Kiara- Siddharth Wedding: कियारा-सिद्धार्थचे पुढच्या वर्षी 'जुळुन येती रेशीमगाठ'

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
Kiara Advani and sidharth malhotra image
Kiara Advani and sidharth malhotra image Saam Tv

मुंबई: सध्या बॉलिवूड (Bollywood) मध्ये लग्नसराई चालू आहे असे बोलले तर वावगं ठरणार नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी रिचा-अलीचे (Richa-Aili Wedding) लग्न धुमधडाक्यात पार पडले. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच आता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Adwani) लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारा रिॲलिटी शो 'कॉफी विथ करण' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या नातेसंबंधावर खुलासे केले होते. (Bollywood Actor) (Bollywood Actress)

त्या आधारावर चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या दोघांच्याही रिलेशनशिपवर सर्वच स्तरातून जोरदार चर्चा सुरू आहे. त्या दोघांनीही आपल्या नात्याची उघडपणे कधीच चर्चा केली नव्हती पण तरीही सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी नात्यांचा अंदाज बरोबर लावला.

Kiara Advani and sidharth malhotra image
Double XL: धोनी नंतर शिखरचेही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण; काही खास फोटो शेअर करत दिली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढील वर्षी एप्रिलमध्ये दिल्लीत फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिद्धार्थचे कुटुंब दिल्लीत असल्याने लग्नही तिथेच होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ आधी कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर कॉकटेल पार्टी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यानंतर कियारा- सिद्धार्थचे ग्रँड रिसेप्शन मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे.

Kiara Advani and sidharth malhotra image
Har Har Mahadev Trailer: 'हर हर महादेव'... स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची गाथा ट्रेलरमधून अनुभवायला मिळणार

स्वतःच्या शैलीत करण मुलाखत घेण्यासाठी खूप प्रसिध्द आहे. त्याच्या शोमध्ये बऱ्याच कलाकार मंडळींचे गुपित उघडकीला येतात. दरम्यान दोघांनी कोणतेही गुपित उघडकीस न येता उत्तरे दिले. दोघांमध्येही असलेल्या नात्यावर उघडपणाने बोलणे त्यांनी टाळले आहे. पण ते लग्नासाठी तयार असल्याचे संकेत मिळत आहे. कियारा- सिद्धार्थ दोघेही लग्नबंधनात पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच ते विराट- अनुष्का, रणवीर- दीपिकासारखे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे बोलले जात आहे.

Kiara Advani and sidharth malhotra image
Ram Setu Trailer: अक्षय कुमार उलगडणार 'राम सेतू'चं रहस्य; ट्रेलर पाहून अचंबित व्हाल!

कॅप्टन बात्रांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह' चित्रपटात कियारा- सिद्धार्थ एकत्र दिसले होते. चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर रिलेशनशिपमध्ये झाले. दोघेही बरेच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांनी आपल्या नात्यावर कधीच नकार दिला नाही. दोघेही बऱ्याचदा पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर एकत्र दिसले होते. दोघेही लवकरच चित्रपटांमधून समोर येणार आहे. कियारा लवकरच आरसी १५ आणि सत्यप्रेम की कथा सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर सिद्धार्थचा 'थॅंक गॉड' हा चित्रपट २५ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com