
मुंबई: क्रिकेट (Cricket) आणि बॉलिवूडचे (Bollywood) नाते खूप जुने आहे. बरेच क्रिकेटर्सने मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून बऱ्याच खेळाडूंनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. धोनीने नव्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केली असून क्रिकेट क्षेत्रासोबत मनोरंजन विश्वातही पदार्पण केले आहे. यापूर्वी क्रिकेटमधून हरभजन सिंग, इरफान पठाण, एस श्रीसंत यांनी अभिनय क्षेत्रात आपले नशीब चमकवले आहेत. पण आता यानंतर प्रसिद्ध क्रिकेटर शिखर धवनही (Shikhar Dhawan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शिखर धवन लवकरच बॉलिवूड चित्रपटात (Bollywood New Movie Release) दिसणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) या दोघीही 'डबल एक्सएल' (Bollywood Actress) चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन नेहमीच करत असतात. या दोघींसोबत शिखर धवनही झळकणार आहे. शिखर धवन चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. हुमाने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या फोटोत शिखरने ब्लॅक सुट घातला असून तर हुमाने रेड गाऊन घातलेला दिसता आहे. त्या लूकमध्ये दोघेही रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत शिखर आणि हुमा दोघेही एकत्र बसले असून कोणत्या तरी विषयावर हसत असल्याचे दिसून येत आहे. (Bollywood Actor)
सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेश या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ज्या आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात. सतराम रमानी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लठ्ठ महिलांसंबंधी असलेल्या काही समस्या आणि गैरसमजांवर भाष्य केले जाणार आहे. याच चित्रपटात शिखर धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.वाढलेल्या वजनावर बऱ्याच दिग्दर्शकांनी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. पण सतराम रमानी दिग्दर्शित 'डबल एक्सएल' चित्रपटाचे खूप वेगळेपण आहे. 'डबल एक्सएल' चित्रपट ज्या प्रकारे महिलांची कथा सांगतो त्याप्रमाणे चित्रपट आपले वेगळेपण दर्शवत आहे.
आपल्या भूमिकेबद्दल शिखर धवन सांगतो, ‘देशासाठी खेळताना मी माझ्या आयुष्यात नेहमीच खूप चांगले काम केले आहे. मी नेहमीच चित्रपट मनोरंजनासाठी पाहतो. जेव्हा ही ऑफर माझ्याकडे आली आणि मी ही कथा ऐकली तेव्हा ही कथा मनाला स्पर्श करून गेली. ही कथा समाजाला खास संदेश देणारी आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक मुली आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाहीत. दरम्यान हुमा आणि सोनाक्षीचा हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.