Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'कांतारा' गाजवतोय अख्खं मार्केट; तर 'सनी संस्कारी'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Kantara Chapter 1 vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : मंगळवारी 'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी' चित्रपटाने किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात. ऋषभ शेट्टीचा चित्रपट थिएटर गाजवत आहे.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी' 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.

'कांतारा चॅप्टर 1' लवकरच बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करेल.

'सनी संस्कारी' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) आणि वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari ) चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाले आहेत. 'कांतारा चॅप्टर 1' भारतात लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तर 'सनी संस्कारी' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

'कांतारा चॅप्टर 1' vs 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने सहाव्या दिवशी 33.5 कोटी रुपये कमावले आहेत. तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाने सहाव्या दिवशी 2.96 कोटी रुपयांची कमाई केली.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

दिवस पहिला - 61.85 कोटी रुपये

दिवस दुसरा- 45.4 कोटी रुपये

दिवस तिसरा- 55 कोटी रुपये

दिवस चौथा- 63 कोटी रुपये

पाचवा दिवस - 31.25 कोटी रुपये

सहावा दिवस - 33.5 कोटी रुपये

एकूण - 290.25 कोटी रुपये

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

  • दिवस पहिला - 9.25 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 5.5 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 7.5 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 7.75 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 3.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 2.96 कोटी रुपये

  • एकूण - 36.21 कोटी रुपये

'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली आहे. तर दुसरीकडे 'सनी संस्कारी' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IndiGo : इंडिगोच्या घोळाचा नेत्यांना फटका, नागपूरला जाणाऱ्या आमदारांची तिकिटे रद्द

Shocking : जालना हादरलं! पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाची सटकली; महिलेचा गळा आवळला अन्...

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Mangal Surya Yuti: 18 वर्षांनंतर एकमेकांच्या जवळ येणार सूर्य-मंगळ; या राशींची होणार चांदीच चांदी

Zodiac signs success: कृष्ण तृतीया आणि मिथुन चंद्र; आजचा दिवस कोणासाठी उघडणार यशाचे दरवाजे?

SCROLL FOR NEXT