Shreya Maskar
'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून चित्रपटात मुख्य भूमिकेत देखील ते झळकले आहे. 'कांतारा चॅप्टर 1'चा पहिला भाग 'कांतारा' 2022 मध्ये रिलीज झाला होता.
'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला असून सहा दिवसांत चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करेल.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने जवळपास 290.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेझॉन प्राइम व्हिडीओने स्ट्रीमिंग अधिकार 125 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'कांतारा चॅप्टर 1' कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
'कांतारा चॅप्टर 1'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही आहे. मात्र चित्रपट पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत ओटीटीवर येईल असे बोले जात आहे.