Shruti Vilas Kadam
“सनी संस्कारी की तुलसी कुमारी” चित्रपटाची स्टारकास्ट नुकतीच बिग बॉस सेटवर पाहायला मिळाली.
या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
त्यांच्यासोबत सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ हे कलाकारही चित्रपटात असतील.
बिग बॉस १९ च्या सेटवर सलमान खान आणि चित्रपटाची टीम एकत्र जमली आणि मस्ती, आनंदाचा वातावरण निर्माण झाला.
रोहित सराफने सेटवरून बीटीएस (बीहाइंड द सीन) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये कलाकारांनी सेटवर डान्स केला आणि चित्रपटाच्या गाण्यांवर त्यांनी मस्ती केली.
रोहित सराफने या अनुभवाला कॅप्शनमध्ये “टू मच फन” असा मजेशीर उल्लेख केल्याचे दिसते, आणि ही भेट बिग बॉस वीकेंड का वार कार्यक्रमाच्या वेळी झाली होती.