Shruti Vilas Kadam
सेलेना गोमेजने तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत २७ सप्टेंबर २०२५ रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.
लग्नानंतर सेलेना आणि बेनी यांनी सुंदर वेडिंग फोटोज शेअर करत लग्नाची पुष्टी केली.
सेलेनाने बॅकलेस व्हाईट लॉन्ग गाऊन परिधान केला होता, तर बेनी ब्लँकोने आकर्षक काळा टक्सीडो घातला होता.
सेलेनाने फोटोशूटमध्ये ब्राइडल एंट्री, लिपलॉक क्षण, आनंदी वातावरण आणि मस्तीने भरलेले क्षण चाहत्यांसमोर आणले.
फोटो शेअर करताना सेलेनाने हार्ट इमोजी वापरला आणि विवाहाची तारीख कॅप्शनमध्ये नमूद केली.
बेनी ब्लँकोने इंस्टाग्रामवर कमेंट करून लिहिले, 'माय वाईफ इन रियल लाईफ'.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून सेलेना आणि बेनीला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.