Shruti Vilas Kadam
उभे राहिल्याशिवाय, म्हणजे बसलेल्या अवस्थेतच करण्यासाठी काही योगासन आहेत यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ही योगासनांचा नियमित केल्याने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिजम वेगवान होण्यास मदत करतो.
गुडघ्यांवर बसून पायांवर पुढे झुकणे हे आसन पोट आणि कमरातील चरबी कमी करण्यास लाभदायक आहे.
सुखासनात बसून शरीराला डावीकडे-उजवीकडे वळवणे हे पोट आणि कमरेच्या स्नायूंना सक्रिय करते.
पद्मासनात बसून दिर्घ श्वास घेणे व सोडणे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा सुधारतो आणि मन शांत करतो.
वज्रासनात बसून पुढे झुकून बेंबीवर हलका दबाव देणे. हे योगासन पोटातील चरबी कमी करण्यास आणि पचनास मदत करते.
एक पाय मोडून, शरीराला उलट दिशेला वळवणे. हे योगासन शरिरातील विषारी तत्त्वे बाहेर काढण्यास आणि स्नायूंना ताण देण्यास उपयुक्त आहे.