Kantara 2 First Look
Kantara 2 First Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara 2 First Look: 'कांतारा २'चा फर्स्ट लूक आऊट, टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर आला काटा

Priya More

Kantara A Legend Chapter 1:

ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा' चित्रपटाला (Kantara Movie) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने दमदार कमाई केली. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ऋषभ शेट्टीने 'कांतारा ए लीजेंड चॅप्टर 1' (Kantara A Legend Chapter 1) आणला आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर (Kantara 2 First Look Teaser) पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. पण आता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची पहिली झलक इतकी जबरदस्त आहे की, चित्रपट किती कमाल याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कांतारा ए लीजेंड चॅप्टर 1' असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातही ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पण त्याला ओळखणं देखील कठीण झाले आहे. अतिशय अप्रतिम पात्रात दिसणाऱ्या ऋषभचा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ऋषभ शेट्टीचा लूक पाहून भीती तर वाटतेच. पण हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबतचा उत्साह वाढला आहे.

या टीझरवरून असे दिसते की, ही देवाची कथा आहे. जी तुम्हाला एका अद्भुत प्रवासावर घेऊन जाईल. कांतारा हा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल अशी माहिती आधीच समोर आली होती. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर जोरदार कमेंट्स केल्या जात आहे. कोणी या चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच ब्लॉकबस्टर हिट म्हटले आहे. तर काहींनी ऋषभ शेट्टीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड मिळेल अशी भविष्यवाणी करत आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, 'चित्रपटाचा टीझर पाहून अंगावर काटा आला.'

'कांतारा' हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाका केला. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की, या चित्रपटाने 400 ते 450 कोटींची कमाई केली. या चित्रपटानंतरच ऋषभ शेट्टीला ग्लोबल स्टारचा दर्जा मिळाला आणि आता 'कांतारा द लीजेंड चॅप्टर 1'च्या माध्यमातून ऋषभ शेट्टीला चांगली पसंती यात काही शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : जादुटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा; 'अंनिस'ची मागणी

Pandharpur Wari: राहुल गांधी वारीला येणार; शरद पवारांचं राहुल गांधींना वारीचं निमंत्रण

VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते L. K. Advani यांची तब्येत खालावली

Zika Virus News : राज्यात झिकाचे आठ रुग्ण, गरोदर महिलांना अधिक धोका

Home Remedies : डासांना दूर ठेवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT