Rinku Rajguru  saam tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru : १६व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण; आर्चीनं मिस केलं कॉलेज लाइफ, रिंकू राजगुरूनं सांगितल्या आठवणी

Rinku Rajguru On College Life : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच 'आशा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात रिंकू राजगुरूने आपले कॉलेज लाइफ मिस केलं. त्यावर अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'आशा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरूने वयाच्या 16 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.

चित्रपटातील करिअरमध्ये रिंकूचे कॉलेज लाइफ मिस झाले.

'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने मोठे यश संपादन केले आहे. 'सैराट'नंतर रिंकूने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. मनोरंजन सृष्टीत आपले नाव कमावले आहे. अशात आता रिंकु पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकूचा आगामी मराठी चित्रपट 'आशा' लवकरच रिलीज होणार आहे.

'आशा' निमित्त रिंकू राजगुरू (Rinku Rajguru ) अनेक मुलाखती देताना दिसत आहे. अशात सकाळ प्रिमियरला दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरूने अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत. अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. रिंकू राजगुरूने 'सैराट' चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. तेव्हा ती 16 वर्षांची होती. खूप कमी वयात तिने मोठे यश मिळवले. तसेच कामाला सुरुवात केली. मात्र या सर्वात तिचे कॉलेज लाइफ कुठे तरी हरवल्याचे, मिस झाल्याचे तिने सांगितले. ती नेमकं काय, बोली जाणून घेऊयात.

रिंकू राजगुरू म्हणाली की, "मी खूप लहानपणी खूप मोठ्या लोकांमध्ये राहिली आहे. वयाने आणि विचाराने मोठी असतील ती लोक. त्यामुळे जो आयुष्याचा मधला काळ कॉलेज, टीनएज (Teenage) सोडून मी डायरेक्ट येथे आले. मी 15 वर्षांची असताना कोसला, मृत्युंजय यांसारखी पुस्तके वाचायला लागली. माझी अचानक ती प्रोसेस झाली. म्हणजे कॉलेजचा कट्टा, कॉलेजची मुलं, अरे चलना येथे खायला जाऊ... हा टप्पा माझ्या आयुष्यात आला नाही. मी थेट नागराज दादा, त्यांची पूर्ण आटपाटची टीम यांच्या सारख्या मोठ्या लोकांच्या संपर्कात आली. ही लोक तुझ्याकडे तितक्याच जबाबदारीने पाहतात. तुला कोणी 16-17 वर्षांची मुलगी आहे, असं नाही पाहत. त्यामुळे जबाबदारी लहानपणापासून आली आणि माणूस खूप कळत गेली. अजूनही कळतात. मी खूप फसते. पण मग माणसे हळूहळू कळत गेली. "

रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत असलेला 'आशा' चित्रपट 19 डिसेंबरला थिएटरमध्ये पाहता येणार आहे. महिलांच्या संघर्षांचा, जिद्दीचा, समाजाशी सुरू असलेल्या लढ्याचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास 'आशा'मधून उलगडत जातो. 'आशा' चित्रपटातील गाणी मनात घर करून राहतात. रिंकूचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत जाताना रस्ता अडवायचा, इन्स्टावर मेसेज अन्...; सिनियरच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Kothimbir Dishes : कोथिंबीरपासून तयार होणाऱ्या ५ अप्रतिम आणि झटपट बनणाऱ्या डिशेस

Suraj Chavan: सूरज चव्हाणने बंगला बांधलाय ते ठिकाण कुठे आहे?

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

SCROLL FOR NEXT