Rinku Rajguru: 'आशा आहे मी कोणी आहे का घरात...'; रिंकू राजगुरूच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Rinku Rajguru: रिंकू राजगुरूच्या मुख्य भूमिकेतला ‘आशा’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. महिलांच्या संघर्षाची भावस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Rinku Rajguru
Rinku RajguruSaam tv
Published On

Rinku Rajguru: ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ या ठसठशीत टॅगलाईनसह येणारा ‘आशा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवत या कथेमागील ताकद, भावना आणि संघर्षाची झलक दाखवली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन १९ डिसेंबरला होणार असून, सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाबद्दल उद्योगातही चर्चेला उधाण आले आहे.

प्रदर्शनाआधीच ‘आशा’चं खूप कौतुक झालं आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत चित्रपटाने समीक्षकांची दाद मिळवली. या सन्मानामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. महिलांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रभावीपणे मांडणारी कथा हा चित्रपट मुख्यत्वे उलगडतो.

Rinku Rajguru
Bollywood Controversy: इंडस्ट्री माफियांचा खरा चेहरा केला उघड; अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकासोबतची कॉल रेकॉर्डींग केली लीक

चित्रपटात रिंकू राजगुरू ‘आशा सेविका’ची भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. आरोग्य यंत्रणेतील एक साधी कर्मचारी असे तिचं बाह्यरूप असलं तरी आशा ही प्रत्येक कुटुंबासाठी आधारस्तंभ, प्रेरणा आणि धैर्याचा आवाज आहे. तिच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, कठीण परिस्थितींशी दोन हात करण्याची तयारी आणि हार न मानणारी ताकद या सर्वांची झलक टीझरमध्ये दिसते. रिंकूच्या या भूमिकेतून महिलांच्या दृढनिश्चयाचा चित्रपटातून ठसा उमटणार आहे.

Rinku Rajguru
Aneet Padda and Ahaan Pandey: 'आम्ही एकमेकांना डेट...'; सैयारा फेम अनिता पड्डासोबतच्या डेटींगबद्दल अहान पांडेने केला मोठा खुलासा

या कथानकात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक पात्र कथा अधिक जिवंत आणि वास्तववादी बनवते.

दिग्दर्शक दिपक पाटील यांच्या मते, ‘आशा’ ही फक्त आरोग्य सेविकांची कथा नाही, तर घर आणि जबाबदाऱ्या सांभाळत पुढे जाणाऱ्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे. तिच्या स्वप्नांची, जिद्दीची आणि धडपडीची कहाणी हे सिनेमाचं हृदय आहे. मराठी प्रेक्षकांना नवे विषय देणाऱ्या या दिग्दर्शकांना या चित्रपटाबद्दल विशेष विश्वास आहे.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओजमार्फत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नव्या दृष्टिकोनातून महिलांच्या आयुष्याला उजाळा देणारा ‘आशा’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी सफर घडवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com