Bollywood Controversy: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या अभिनय आणि स्पष्टवक्तेपणामुळे देखील ओळखली जाते. मुकेश भट्ट निर्मित "सावी" या चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच आलिया भट्टच्या "जिगरा" हा चित्रपट "सावी" ची कॉपी असल्यावरून दिव्या आणि मुकेश यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मुकेश भट्टने याला बातम्यांना पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे आणि म्हटले आहे की, "आलियाला कॉपी चित्रपटाची आवश्यकता नाही." दरम्यान, दिव्याने मुकेशसोबतचा एक फोन कॉल लीक केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिव्याने मुकेश भट्टसोबतचा फोन कॉल लीक केला
दिव्या खोसलाने तिच्या इंस्टाग्रामवर मुकेश भट्टसोबतच्या या फोन कॉलचे रेकॉर्डिंग शेअर केले आहे. रेकॉर्डिंगमध्ये त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येते. त्यात दिव्या मुकेशला विचारते, "सावी आणि 'जिगरा' वादाबद्दल तुम्ही माझ्याविरुद्ध काही बोललात का, मी फालतू वागते असे तुम्ही मीडियासमोर का म्हटल?" मुकेश स्पष्टपणे याला नकार देत म्हणतात, "मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही. हे सर्व मुदाम प्लॅनिंगने होत आहे. मी असे का करेन? हे तुझ्या वाढदिवसासाठी कॉन्ट्रॉव्हर्सी म्हणून होत आहे, पण त्याचा आपल्या नात्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. कोणाच्याही फसवणुकीत अडकू नको.
मला धक्का बसला आहे...
दिव्याने फोन कॉल शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "या खुलाशाने मला धक्का बसला आहे. मला अलीकडे जे कळले ते हृदयद्रावक आहे. जड अंतःकरणाने, मला वाटते की हे सत्य लोकांसमोर आणणे महत्वाचे आहे, विशेषतः आपल्या चित्रपट उद्योगात लॉबिंग आणि गेटकीपिंगचा सामना करणाऱ्या सर्व कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी."
इंडस्ट्री माफियांचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे...
अभिनेत्रीने पुढे लिहिले, "दुर्दैवाने, मुकेश भट्ट आणि माझ्यामधील संभाषण शेअर करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही जेणेकरून लोकांना स्वतःला ऐकू येईल की काही बॉलिवूड मधील ग्रूप बाकिच्यांचे करिअर कसे खराब करण्याचा आणि त्यांची ईमेज खराब करण्याचा कसा प्रयत्न करतात. आता बोलण्याची आणि इंडस्ट्री माफियांचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.