Shruti Vilas Kadam
शरीरात पाण्याचा अभाव होतो तेव्हा डिहायड्रेशनमुळे तीव्र डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
पाणी कमी असल्याने हृदयावर ताण येतो आणि हृदय रोगांचा धोका वाढू शकतो.
द्रवपदार्थ कमी झाल्याने मूत्रमार्गातील समस्या निर्माण होऊ शकतात आणि किडनी खराब होण्याचा धोका असतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे मनात चिडचिडेपणा, स्ट्रेस आणि मूड स्विंग्स येऊ शकतात.
डिहाइड्रेशनमुळे शरीरातील ऊर्जेचे पातळीत घट होते, यामुळे सतत थकवा येतो.
पुरेसा पाणी नसेल तर सोडियम-पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, यामुळे स्नायूंची ऐंठन, कमजोरी किंवा इतर गंभीर समस्या येऊ शकतात.
अतिशय गंभीर डिहाइड्रेशनमुळे रक्तातील द्रवपदार्थ कमी होऊन हृदयावर ताण येतो आणि हृदय झटका येण्याची शक्यता वाढू शकते.