Shruti Vilas Kadam
सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेच चेहऱ्यावर नारळ तेल लावा यामुळे आठवड्याभरात ड्राय त्वचा मॉइश्चर व्हायला सुरुवात होते.
नारळ तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर असून कोरडी, खरखरीत त्वचा मऊ आणि हायड्रेटेड करते.
यात लॅरिक अॅसिड असल्यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया कमी होतात आणि पिंपल्सचा धोका कमी होतो.
रोज हलक्या मसाजने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा अधिक फ्रेश दिसते.
अँटीऑक्सिडंट्समुळे रिंकल्स, बारीक रेषा आणि एजिंगची चिन्हे कमी दिसतात. नारळ तेलातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे लालसरपणा, सूज, इरिटेशन कमी होते.
मेकअप रिमूव्हर म्हणूनही नारळ तेल उत्तम काम करते. धूळ, मळ आणि मेकअप सहज काढते.
नियमित वापराने त्वचेचा टोन सुधारतो आणि पिगमेंटेशन किंवा डाग हलके होण्यास मदत मिळते.