'RHTDM'-Re-Release 'RHTDM'-Re-Release
मनोरंजन बातम्या

Box Office Collection of 'RHTDM'after Re-Release : 'रहना है तेरे दिल में' पुन्हा झाली रिलीज

'RHTDM'ने कमावला कितीचा गल्ला : रि-रिलीजनंतर - पुन्हा मिळते आहे पसंती ?

Sneha Dhavale

अतिशय गोड, गोंडसं आणि तितकीच सुंदर दिसणारी दिया मिर्झा तुम्हाला आठवते का ? आणि साऊथचा स्टार अभिनेता आर. माधवनही तुमच्या लक्षात असेल. 2001 साली माधवन , सैफ अली खान आणि दिया तिघांना घेऊन गौतम वासुदेव मेनन यांचा एक रोमँटिक सिनेमा आला होता. गौतम मेनन यांनीच या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. या सिनेमाचे नाव होते 'रहना है तेरे दिल में'.

खरंच, 2001मध्ये 'रहना है तेरे दिल में' रिलीज झाल्यानंतर तरुणाईचं भरपूर पसंती या सिनेमाला मिळाली होती. त्यावेळी या सिनेमानं हॉक्स ऑफिसवर 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा गल्ला जमवला होता. 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यावेळी विशेष कलेक्शन काही ही फिल्म करु शकली नाही. पण, जसजसा वेळ पुढे गेला तसतसा लोकांना या सिनेमाविषयी आवड निर्माण झाली.

या सिनेमाचा टाय़टल ट्रॅक आणि इतर गाणी अजूनही अनेकांच्या ओठांवर आहेत. RHTDM या शॉर्टफॉर्ममुळे सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. अभिनेता आर माधवन आणि दिया मिर्झा या दोघांची प्रचंड क्रेझ यामुळं निर्माण झासा. या दोन्ही कलाकारांच्या फॅन-फॉलोइंगमध्ये चांगलीच वाढही झाली होती. नेमकं हेच ओळखून या सिनेमाच्या निर्मात्यांनी तब्बल 23 वर्षांनंतर 'रहना है तेरे दिल में' सिनेमागृहात पुन्हा रिलीज करायचे ठरवले. 30 ऑगस्ट 2024 ला हा सिनेमा परत रिलीज करण्यात आला.

या रि-रिलीजनंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या सिनेमाला मिळाला आहे. परत एकदा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या शानदार प्रतिक्रिया 'रहना है तेरे दिल में'या सिनेमाला मिळत आहेत. पुणे, मुंबईसह काही अन्य ठिकाणीही ही फिल्म पुन:प्रदर्शित झाली आहे. पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर 'रहना है तेरे दिल में' पहिल्या 10 दिवसांमध्ये जवळपास 3.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दूसऱ्याच वीकेंडमध्ये 'रहना है तेरे दिल में' पहिल्या वीकेंड इतकीच कमाई केली आहे. त्यामुळं निर्मात्यांसाठी नक्कीच ही बाब आनंदाची आहे. मुंबईसह पुण्यातही 'रहना है तेरे दिल में'ला पुन:प्रदर्शनानंतर चांगलीच पसंती मिळाली आहे. पुण्यात रि-रिलीजनंतरच्या 10 दिवसांमध्ये या सिनेमानं 75 लाख रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. ही बाबा एका सिनेमासाठी नक्की विशेष आहे.

या सगळ्यात एक खास बात अशी की, 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी चर्चा रंगत आहे. 'रहना है तेरे दिल में' च्या सिक्वलमध्ये अभिनेत्री कृती सेनोन असेल असंही म्हटलं जात आहे. असो, पण सध्यातरी पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर 'रहना है तेरे दिल में' प्रेक्षकांचं मन वेधण्यात यश मिळवतो आहे, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT