मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty Viral Video: रियाच्या आयुष्यात पुन्हा फुलणार प्रेमाची पालवी, मुंबईच्या रस्त्यावर बॉयफ्रेंडसोबत बाईक राईडचा व्हिडिओ व्हायरल

Rhea Chakraborty With Boyfriend Viral Video : अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रेमात असल्याच्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे, त्याला कारणही तसेच आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये रिया रुमर्ड बॉयफ्रेंड निखिल कामथ याच्यासोबत दिसत आहे. रिया आणि निखिल यांच्या बाईक राईडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या (Sushant Singh Rajput) मृत्युचा प्रेक्षकांसह बॉलिवूडमधील अनेकांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्युनंतर रियाचं (Rhea Chakraborty) नाव खूप चर्चेत आलं होतं. रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते, त्यामुळे सुशांत याच्या आत्महत्या प्रकरणात रियाचं नाव पुढे आले. सुशांतच्या निधनाला आता चार वर्षांचा काळ उलटलाय, रियानेही मुव्हऑन होत नवा जोडीदार निवडला आहे.

रियाने (Rhea Chakraborty) बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे, पण ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता निखिलसोबतच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रिया परत चर्चेत आली आहे. रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

व्हिडिओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिया (Rhea Chakraborty) कथित बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत (Nikhil Kamat) मुंबईमध्येच फिरायला गेल्याचं दिसत आहे. दोघे मुंबईतील रस्त्यांवर बाईक राईडचा आनंद घेताना दिसत आहेत. परंतु या व्हिडिओमुळे रियाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी निखिलला रियापासून दूर राहाण्याचा सल्ला दिलाय.

निखिल कामथ कोण आहे?

रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) कथित बॉयफ्रेंड निखिल कामथ (Nikhil Kamat) हा एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. 2024 मधील फोर्ब्सच्या (Forbes) यादीत निखिलला स्थान मिळाले होते. फोर्ब्सनुसार निखिल 3.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचा मालक आहे. दरम्यान रिया आणि निखिल खरेच प्रेमात आहेत का? त्यांच्यामध्ये नेमकं काय सुरु आहे. आपल्या नात्यावर निखिल अथवा रिया यांनी अधिकृत कोणताही माहिती दिलेली नाही. याआधाही दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरु आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT