Marathi Actress x
मनोरंजन बातम्या

Marathi Actress : नवऱ्याचं अफेअर कळलं, नंतर अभिनेत्रीनं मोठं पाऊल उचललं, आता दुसऱ्या व्यक्तीसोबत ८ वर्षांपासून राहतेय लिव्ह इनमध्ये

Entertainment News : मराठी अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याला रंगहात पकडलं. अफेअरबाबत समजताच त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. पण त्याचं लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे

Yash Shirke

मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीस सध्या चर्चेत आहे. तिनं अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं आहे. वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमुळे ती कामयच चर्चेत राहिली आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर रेशमने पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली. तेव्हा तिने पतीचे दुसरं लग्न लावून दिलं होतं. या निर्णयामुळे आता पश्चाताप होत असल्याचे रेशमने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता संजीव सेठशी रेशमने लग्न केलं होतं. पण लग्नानंतर त्यांना मुलंही झाली. पण काही वर्षांनी रेशमला संजीव यांच्या अफेअरची समजलं. तिने संजीव यांना दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली. स्वत: रेशमने संजीव यांचं दुसरं लग्न अभिनेत्री लता सभरवालशी लावून दिलं.

काही दिवसांपूर्वी संजीव सेठ आणि लता सभरवाल यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. लग्नाच्या तब्बल पंधरा वर्षांनी दोघांनी वेगळं राहण्याचं ठरवलं. लता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. संजीव आणि लता यांच्या घटस्फोटानंतर रेशम टीपणीसची चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

रेशम टिपणीसने १९९३ मध्ये अभिनेता संजीव सेठसोबत विवाह केला होता. काही वर्षे दोघांचा संसार आनंदात सुरू होता. मात्र, नंतर २००४ मध्ये त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजीव सेठने अभिनेत्री लता सभरवालसोबत दुसरं लग्न केलं. रेशमनं एका मुलाखतीत सांगितलं की, घटस्फोटानंतर तिच्या मनात थोडाफार पश्चाताप होता. मात्र, संजीवच्या दुसऱ्या लग्नाबद्दल ती आनंदी होती. इतकंच नव्हे तर रेशम आणि संजीवची दुसरी पत्नी लता सभरवाल यांच्यातही मैत्री टिकून आहे. दरम्यान, रेशम टिपणीस गेल्या नऊ-दहा वर्षांपासून अभिनेता संदेश किर्तीकरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT