Raza Murad x
मनोरंजन बातम्या

Actor Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा, निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

Raza Murad News : रझा मुराद यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यूबाबत अफवा पसरवल्या जात असल्याने रझा मुराद यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Yash Shirke

  • अभिनेते रझा मुराद यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

  • या अफवेविरोधात त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  • पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

Raza Murad :जेष्ठ बॉलिवूड अभिनेते रझा मुराद यांच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मृत्यूची खोटी बातमी पसरल्यानंतर रझा मुराद यांनी मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझा मृत्यू झाला आहे अशी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला, असे रझा मुराद यांनी म्हटले आहे.

रझा मुराद यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या अफवार संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी अजूनही जिवंत आहे, पूर्णपणे निरोगी आहे. पण काही लोक विचार न करता अशा अफवा पसरवतात. हे खूप त्रासदायक आहे. या अफवांवर वारंवार स्पष्टीकरण देऊन आता मी थकलोय. मला जगभरातून फोन आणि मेसेज येत आहेत. लोक मला पोस्टचे स्क्रीनशॉट पाठवत आहेत.

मृत्यूच्या अफवांना रझा मुराद यांनी लज्जास्पद म्हटले आहे. अशा खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मजे लोक त्यांच्या आयुष्यात काहीही करुन शकत नाही, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा अफवा पसरवत असतात. अशा बेजबाबदार कृत्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी रझा मुराद यांनी केली आहे.

रझा मुराद यांनी त्यांच्या मृत्यूच्या खोटी बातमी पसरवणाऱ्यांच्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या बनावट पोस्टबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासाठी सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

SCROLL FOR NEXT