yashraj favorite marathi actress Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yashraj Mukhate: यशराज मुखाटे बॉलिवूडच्या नाही, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात

यशराज मुखाटेला 'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' त्याच्या चाहत्याने असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी यशराजने एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव उच्चारले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yashraj Mukhate: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातीलच क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवणारा यशराज मुखाटे. याच्या व्हिडिओंची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील व्हिडिओ बऱ्याचदा चर्चेत आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अख्ख्या देशभरात धुमाकुळ घालणाऱ्या 'रसोडे मैं कौण था' या गाण्याच्या माध्यमातून तो बराच चर्चेत आला होता. त्याने त्या गाण्याला पारंपारिक म्युझिक देत रंजक पद्धतीने बनवले होते.

त्याचे अनेक क्रिएटिव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याने क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बराच काळ त्या व्हिडिओचा ट्रेंड कायम ठेवला होता. मराठी- हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेमा, बॉलिवूड, टॉलिवूड मधील अनेक गोष्टींकडे लक्ष असते.

त्याचे सोशल मीडियावर 'रसोडे में कौन था', 'पावरी हो रही' यांसारख्या अनेक हिट गाण्यांनंतर त्याने अनेक चित्रपटांनाही गाणे दिली आहेत. त्याच्या अनोख्या क्रिएटिव्हीटीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.

यशराज मुखाटे सोशल मीडियावर बराच चर्चेत असून त्याच्या विविध क्रिएटिव्हीटी आणि संकल्पना जाणून घेण्यासाठी तो आपल्या चाहत्यांसोबत गप्पाही मारतो. सहजच त्याच्या चाहत्याने त्याच्या खासगी आयुष्यावर एक प्रश्न विचारला होता.

'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' त्याच्या चाहत्याने असा प्रश्न विचारला होता. त्याने यावेळी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव उच्चारले असून यावेळी त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.

यशराज मुखाटेच्या आवडत्या अभिनेत्रीचे नाव वैदेही परशुरामी आहे. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. वैदेहीने देखील ही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केली आहे. दरम्यान यशराजला मराठी अभिनेता कोण? असा प्रश्ना विचारला होता.

त्यावेळी त्याने प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे आणि गिरीश कुलकर्णींचे नाव घेतले. वैदेहीने आपल्या उत्तमोत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिने मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

ती नेहमी वेगवेगळ्या धाटणीची भूमिका साकारत असून तिचा चाहतावर्ग ही बराच मोठा आहे. नुकतीच ती 'झोम्बीवली' या चित्रपटात झळकली होती.येत्या काही दिवसात वैदेही 'एकदोनतीनचार' या मराठी चित्रपटात निपुण धर्माधिकारीसोबत झळकणार आहे.

हा चित्रपट एक हलकी-फुलकी लव्हस्टोरी असणार आहे. आता तिला नवीन चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. त्याचबरोबर सध्या ती झी मराठीवरील 'फूबाईफू' या शो मध्ये सूत्रसंचालन करत असून तिचा हा नवा अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Thane Water Crisis : ठाण्यात जलसंकट! या महत्वाच्या भागांत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद

Hair Care: केस ड्राय आणि फ्रिझी झालेत? मग घरच्या घरी तयार करा 'हा' खास हेअर मास्क

SCROLL FOR NEXT