Rasika Dugal On Mirzapur Instagram @rasikadugal
मनोरंजन बातम्या

Mirzapur Update: मिर्झापूर 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री रसिका दुगलने दिली माहिती

रसिका दुगल तिसऱ्या सीझनसाठी सज्ज झाली आहे. मिर्झापूरचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे तिने सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mirzapur Season 3 Update: सध्या तरुणाई चित्रपटापेक्षा वेबसीरिज पाहणे जास्त पसंत करते. निर्माते वेबसीरिज बनवताना कथानकावर विशेष लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशीच एक प्रसिद्ध वेबसीरिज म्हणजे 'मिर्झापूर'. मिर्झापूर ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. त्याचप्रमाणे या वेबसीरिजमधील पात्र सुद्धा गाजली.

मिर्झापूरमधील एक पात्र म्हणजे बीना त्रिपाठी. ही भूमिका रसिक दुगल हिने साकारली आहे. रसिकाच्या या भूमिकेची प्रचंड चर्चा झाली. रसिक आता तिसऱ्या सीझनसाठी सज्ज झाली आहे. मिर्झापूर या वेबसीरिजमुळे रसिका नावारूपास आली. बीना त्रिपाठी या भूमिकेमुळे रसिकाला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.

मिर्झापूर सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येऊन दोन वर्ष झाली आहेत. रसिका 'मिर्झापूर' कुटुंबातील एक महत्त्वाची सदस्य आहे. मिर्झापूर सीझन 2'च्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त रसिकाने तिचा अनुभव शेअर केला आहे. (Web Series)

रसिका म्हणाली: "'मिर्झापूर'वर प्रेक्षकांनी केलेले प्रेम नेहमीच उत्साहवर्धक असते. मी बीना असण्याचा आनंद घेते आहे. तसेच हा प्रवास एक वेगळाच अनुभव मला देऊन गेला."

"मिर्झापूरचे कलाकार आणि क्रू उत्कृष्ट आहेत. त्या सर्वांमुळे चित्रीकरणाची प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही खास बनतात."

"दोन वर्षे पूर्ण झाली आणि तरीही आम्ही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहोत, याबद्दल मी स्वःताला खूप खूप धन्य समजते. प्रेक्षकांना सीझन 3 उत्सुकता आहे. मी देखील त्यांच्यासोबत नवीन सीझन शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे."

रसिका 'स्पाइक', 'अधुरा', 'फेरी फोक' आणि 'लॉर्ड कर्झन की हवेली' या आगामी प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT