Rashmika Mandanna Instagram@RashmikaMandanna
मनोरंजन बातम्या

'नॅशनल क्रश' रश्मिकानं जबरा फॅनच्या हृदयावर दिला ऑटोग्राफ; श्रीवल्लीचा VIDEO तुफान व्हायरल

रश्मिका मंदानाचा चाहत्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: पुष्पा चित्रपट कमालीचा हिट ठरला. त्यातले डायलॉग आणि गाणी तर सुपरहिट. या चित्रपटातील 'सामी..' हे गाणं जिच्यावर चित्रित झालं, त्या रश्मिका मंदानानं (Rashmika Mandanna) तर नृत्य अन् अदांनी चाहत्यांचं काळीज चोरलं. रश्मिकाची खासियत म्हणजे तिच्या नजरेतून सुटलेले 'तीर' थेट चाहत्यांच्या हृदयाला भिडतात. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नॅशनल क्रश असलेली रश्मिका सोशल मीडियावर (Social Media)कायम चर्चेत असते. रश्मिका मंदानाचे देशभरात लाखो चाहते आहेत. तिच्या एकेक झलक नजरेत साठवून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.

सोशल मीडियावर रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच रश्मिकाचा तिच्या एका चाहत्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे रश्मिका सध्या प्रकाशझोतात आली आहे.

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाने 'पुष्पा' या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळवली. चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या रश्मिका मंदानाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाला रश्मिका मंदाना आली होती. त्यावेळी ती चाहत्यांना भेटली. रश्मिकाच्या एका चाहत्याने तर तिच्याकडे ऑटोग्राफ मागितला. पण ऑटोग्राफ आपल्या हृदयावर द्यावा, अशी विनंतीवजा हटके मागणीच त्याने केली. त्यावर रश्मिकानंही या चाहत्याला निराश केलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हृदयावर दिला ऑटोग्राफ

अभिनेत्री रश्मिका मंदानाचे लाखो चाहते आहेत. रश्मिका कुठेही दिसली तरी, तेथे चाहते तिला गराडा घालतात. मुंबईतील कार्यक्रमातही असंच काहीसं घडलं. रश्मिकाचा एक चाहता तिच्याकडे आला. त्याने कागदावर नव्हे तर, हृदयावरच ऑटोग्राफ द्यावा अशी विनंती रश्मिकाकडे केली. त्यावेळी रश्मिकाही थोडी हबकली. मात्र, तिनं या चाहत्याला निराश केलं नाही. त्याच्या टीशर्टवर तिनं ऑटोग्राफ दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हिट ठरत आहे.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूड डेब्यू गुडबायच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्री लवकरच अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द रुलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, रश्मिका ही सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' मध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT