सध्या एकाच चित्रपटाची सिनेमागृहात चर्चा आहे तो म्हणजे 'छावा'. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यामागची संपूर्ण कथा या चित्रपटातून संपूर्ण जगासमोर आली आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची आणि महाराणी येसूबाई यांची भूमिका महत्वाची आहे.
चित्रपटातील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसते आहे. रश्मिकाने येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. येसूबाईंचे संघर्ष, त्यांची ताकद चित्रपटातून दिसत आहे. येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांची खूप साथ दिली. याचसोबत त्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे.
येसूबाई भोसले यांच्या जन्म मराठ्यांचे प्रमुख सरदार राजौ शिर्के यांच्या घराण्यात झाला. पुढे त्यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराज याच्यांशी झाला. स्वराज्याच्या लढ्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
'छावा' चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाने महत्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकरली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील रश्मिकाच्या अभिनयाचे विशेष कौतुक करत आहे. रश्मिकाने देखील चित्रपटात तिला मिळालेल्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे," ती म्हणाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दक्षिणेतून येणाऱ्या मुलीसाठी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारण्याची संधी मिळणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे."
रश्मिका मंदानाचा दमदार आणि भावनिक अभिनय या पात्राला अजरामर करतो आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना येसूबाईंचे धैर्य आणि ताकद जाणवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.