Ankita Walawalkar: लग्नानंतर अंकिताचं नाव बदललं? कुणालने कानात नवीन नाव सांगताच काय म्हणाली कोकण हार्टेड गर्ल...

Ankita Walalwalkar- Kunal Bhagat Wedding: अंकिताने प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील सर्व कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
Entertainment News
Ankita WalawalkarSaam Tv
Published On

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली आहे. अंकिताच्या वालावलकर रिसॉर्टमध्ये तिचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अंकिता आणि कुणालने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील सर्व कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Entertainment News
Ankita Walwalkar-Kunal Bhagat: अवॉर्ड शोमध्ये भेट ते थेट प्रेम, कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर- कुणालची लव्हस्टोरी

अंकिताच्या प्रीव्हेडिंग ते लग्नसोहळापासूनच्या सर्व थीम निरनिराळ्या होत्या यामध्ये आता अंकिताच्या लग्नसोहळ्यानंतरच्या विधींची सध्या चर्चा रंगली आहे. यामधील अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये कुणाल अंकिताचं लग्नानंतरच नाव तिला कानामध्ये सांगत आहे. यावरून कुणालने अंकिताचं लग्नानंतरचं नाव काय ठेवलं असेल याची चर्चा रंगली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नसोहळ्यात अंकिता आणि कुणाल दोघेही आनंदी दिसत आहे. कुणाल अंकिताला तिच्या कानामध्ये नवीन नाव सांगत आहे. यानंतर दोघांनीही पूजा विधी देखील केल्या आहेत. अंकिता ही खूप खूश दिसत आहे. पुढे अंकिताला काय ठेवलं काय ठेवलं नाव असं विचारतात यावर अंकिता म्हणते मी नावं ठेवण्यासारखी नाहीच आहे यामुळे माझं नाव अंकिताच ठेवलं आहे.

Entertainment News
Chhaava Box Office Collection : 'छावा'ची उंच भरारी! अवघ्या ४ दिवसात चित्रपटानं केलं बजेट वसूल, कलेक्शनचा आकडा किती?

लग्नानंतर नाव बदलण्याची प्रथा अनेक ठिकाणी सुरू आहे. लग्नानंतर मुलीला तिच्या सासरच्यांची खास ओळख मिळत असते. पूर्वीच्या आई वडिलांच्या नावानंतर आता पतीचे नाव मुलीच्या नावापुढे असते यामुळेच आता प्रसिद्ध अभिनेत्री अंकिताचं नाव नेमकं काय असणार याची चर्चा सुरू आहे. मात्र अंकिताने स्वत: सांगितलं आहे की लग्नानंतर माझं नाव हे अंकिता असच असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com