Rapper Raftaar Singh and His Wife Komal Vohra Fill For Divorce
Rapper Raftaar Singh and His Wife Komal Vohra Fill For Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rapper Raftaar Divorce: रॅपर रफ्तार लग्नाच्या ६ वर्षानंतर देणार पत्नी कोमल वोहरला घटस्फोट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री. अनेकांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे वृत्त दररोज समोर येत आहे. अलीकडच्या काही वर्षांत या चंदेरी दुनियेतील अनेक जोडप्यांनी एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणखी एक जोडपं विभक्त होणार आहे. आपल्या जबरदस्त रॅपिंग आणि अप्रतिम स्टाईलने चाहत्यांमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारा रॅपर रफ्तार सिंग (Rapper Raftaar)आता त्याची पत्नी कोमल वोहरा (Komal Vohra) हिला घटस्फोट (Divorce) देणार असल्याचे वृत्त आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर त्यांनी आपले वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

रॅपर रफ्तार सिंगने त्याची पत्नी कोमल हिच्यासोबत २०१६ मध्ये लग्न केलं होत. आता दोघेही आपलं वैवाहिक नातं संपवणार आहेत. २०२०मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण काही कारणास्तव दोघांचा घटस्फोट होऊ शकला नाही. रफ्तार अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीपासून वेगळा राहत आहे. दोघे बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत होते.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रफ्तार आणि कोमल यांचा घटस्फोट कोरोना महामारीमुळे पुढे ढकलला गेला आणि आता दोघेही ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून आपले नाते संपवणार आहेत. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले होते, परंतु एकमेकांच्या कुटुंबांसाठी ते दोघे हा संसार करत होते. परंतु आता अखेरीस त्यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आहे. रफ्तार आणि कोमल यांनी आपापल्या इन्स्टाग्राम हँडलवरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाचे फोटोही इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काढून टाकेल आहेत.

कोमल ही टीव्ही कलाकार करण आणि कुणाल वोहरा यांची बहीण आहे. रफ्तार आणि कोमलच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ५ वर्षांच्या एकत्र सहवासानंतर दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले. आता २०२२ मध्ये त्यांचं नातं संपुष्टात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

ICSE Result News | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा आमरस पोळीचा नैवेद्य, पाहा रेसिपी

SCROLL FOR NEXT