कोरिओग्राफर गणेश आचार्यला जामीन, महिला डान्सरने केला होता लैंगिक छळाचा आरोप

या महिलेने फेब्रुवारी 2020 मध्ये गणेश आचार्य विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
Ganesh Acharya
Ganesh AcharyaSaam Tv

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य याला लैंगिक छळ प्रकरणी जामीन मिळाला आहे. मुंबईतील (Mumbai) दंडाधिकारी न्यायालयाने गणेश आचार्य (Ganesh Acharya) याचा जामीन मंजूर केला आहे. गणेश आचार्य याच्यावर एका महिला कोरिओग्राफरने लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यानंतर पोलिसांनी (Police) गणेश आचार्यविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. ही घटना 2020 घडल्याची माहिती समोर आली आहे.

रुवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला. या महिलेने फेब्रुवारी 2020 मध्ये गणेश आचार्य विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

हे देखील पाहा -

या महिलेने कोरिओग्राफरवर आरोप केला होता की, जेव्हा ती गणेश आचार्यच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिच्यावर चुकीच्या कमेंट करण्यासोबतच अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडण्यात आले. महिलेने पुढे सांगितले की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा गणेश आचार्यने तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

यासोबतच महिलेने आरोप केला आहे की, या कारणास्तव इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनने सहा महिन्यांनंतर तिचे सदस्यत्वही रद्द केले आहे. आचार्य यांनी इतर महिलांचेही लैंगिक शोषण केले असल्याचा गंभीर आरोपही या महिलेने केला आहे.

Ganesh Acharya
विदेशातही गाजले एकनाथ शिंदे! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

त्याचवेळी कोरिओग्राफर गणेश आचार्यने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. हा सर्व प्रकार आपल्याला अडकवण्याचा कट असल्याचे त्याने म्हटले होते. एवढेच नाही तर गणेश आचार्यने त्या महिलेविरुद्ध पोलिसांत नोंदविला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com