Ranveer Singh Net Worth : रणवीर सिंग हा एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता आहे. जो त्याच्या अष्टपैलुत्व व्यक्तिमत्व आणि विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. 6 जुलै 1985 रोजी मुंबईत जन्मलेल्या रणवीरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इंडियाना विद्यापीठात शिक्षण घेत असताना, त्याने क्रिएटिव्ह रायटिंग आणि रंगभूमीवर लक्ष केंद्रित करून कला शाखेत पदवी प्राप्त केली.
भारतात परतल्यानंतर रणवीरने सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मात्र, बॉलीवूडचा हिरो बनणे हे त्याचे ध्येय होते. सुरुवातीच्या संघर्षांना आणि नकारांना तोंड दिल्यानंतर, डिसेंबर 2010 मध्ये यशराज फिल्मच्या "बँड बाजा बारात" च्या रिलीजने त्याला यश मिळाले. या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली आणि रणवीर सिंगने त्याची प्रतिभा या चित्रपटामध्ये दाखवली. या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी झोतात आला. (Latest Entertainment News)
2013 मध्ये, विक्रमादित्य मोटवानेच्या "लुटेरा" मधील रणवीरच्या अभिनयाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. संजय लीला भन्साली यांच्या "गोलियों की रासलीला राम-लीला" ने त्याला सुपरस्टार बनवले. तेव्हापासून, त्याचे जवळजवळ सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आहेत, गेल्या दशकातील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याने त्याचे स्थान मजबूत केले आहे.
विकिपीडिया, फोर्ब्स आणि IMDB सारख्या विविध स्त्रोतांनुसार, रणवीर सिंगची अंदाजे एकूण संपत्ती $30 दशलक्ष (अंदाजे 245 कोटी रुपये) आहे. तो एका चित्रपटासाठी 20 कोटीचे मानधन घेतो आणि अनेक नामांकित कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या व्यतिरिक्त, तो त्याच्या चित्रपटांमधून काही टक्के प्रॉफिट कमावतो. 2019 मध्ये, तो भारतातील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा अभिनेता होता.
रणवीर सिंग हेड अँड शोल्डर्स, चिंग्स, जॅक अँड जोन्स, थम्स अप, मेक माय ट्रिप, मन्यावर, बिंगो, सेट वेट, कोलगेट आणि यासह अंदाजे 28 ब्रँड्सचे प्रमोशन करतो. व्यापार विश्लेषकांच्या मते, तो ब्रँड एंडोर्समेंटसाठी 4-5 कोटी घेतो. त्याची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे रु. 84 कोटी आहे.
रणवीरला त्याच्या अनोख्या फॅशनसाठी ओळखले जाते. रणवीरकडे सुमारे 1000 जोड्यांच्या शूजचे कलेक्शन आहे ज्याचे मूल्य रु. 68 लाख आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान कर आहेत, ज्यात Aston Martin Rapid S, Mercedes Benz GLS, Jaguar XJ L कारचा समावेश आहे.
रणवीर सिंगचा अभिनेता ते बॉलीवूड सुपरस्टार हा प्रवास त्याचे समर्पण, प्रतिभा प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याची क्षमता दर्शवितो. त्याने त्याच्या उत्तम कामगिरीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची माने जिंकली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.