Deepika Padukone Ranveer Singh abu dabi ad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण ठरले आहे तिचा अबू धाबी पर्यटनाच्या जाहिरातीतील पारंपरिक हिजाब लुक.

Shruti Vilas Kadam

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण ठरले आहे तिचा अबू धाबी पर्यटनाच्या जाहिरातीतील पारंपरिक हिजाब लुक. या जाहिरातीत दीपिका आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंग हे दोघे अबू धाबीतील सुंदर पर्यटन स्थळे दाखवत, स्थानिक संस्कृतीचा आदर करताना दिसतात. मात्र, जाहिरात प्रदर्शित होताच सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली.

जाहिरातीतील एका दृश्यात दीपिका मशिदीत प्रवेश करताना अबाया आणि हिजाब परिधान केलेली दिसते. काही लोकांनी तिच्या या लुकवर नाराजी व्यक्त करत “दीपिकाने इस्लामी पोशाखात का फोटोशूट केलं?”, “ती भारतीय संस्कृती विसरली का?” असे प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी तिच्यावर ‘धार्मिक दिखावा’ करत असल्याचा आरोपही केला. तर, एका नेटकऱ्याने 'दोन्ही कलाकारांनी इतर देशांइतकेच भारताचेही प्रमोशन केले असते तर बरे झाले असते.' अशी टिका केली.

काहींनी दीपिकाच्या "माय चॉइस" व्हिडिओची आठवण करून दिली आणि लिहिले, "आता ती हिजाब घालून पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. 'चॉइस' बद्दलच्या तिच्या भूमिकेचे काय झाले?" काही दिवसांपूर्वी, दीपिकाने महिला सक्षमीकरणासाठीच्या मोहिमेसाठी 'व्होग एम्पॉवर' या लघुपटात "माय चॉइस" मध्ये काम केले होते. या व्हिडिओमध्ये दीपिकाने महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकारावर एक कविता वाचून दाखवते, त्यामुळे देखील बराच वाद निर्माण झाला होता.

या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. काही नेटकऱ्यांनी दीपिकाच्या विविधता आणि परंपरांबद्दलच्या आदराचे कौतुक केले, तर काहीजण तिने भारतीय संस्कृतीचा प्रचार न केल्याबद्दल निराश आहेत. दीपिका किंवा रणवीर दोघांनीही अद्याप ट्रोलिंगला प्रतिसाद दिलेला नाही.

दरम्यान, ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच अबू धाबी पर्यटन विभागाच्या सोशल मीडियावर व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री, तसेच अबू धाबीचं अप्रतिम सौंदर्य या दोन्ही गोष्टींमुळे जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT