Shruti Vilas Kadam
सणांच्या काळात त्वचेवर मेकअप, धूळ व प्रदूषण साचते. त्यामुळे दररोज सौम्य, हायड्रेशनयुक्त क्लेन्सरने चेहरा धुवा. साबण किंवा चुकीचा फेसवॉश वापरल्यास त्वचेतील नैसर्गिक तेलं निघून जातात आणि त्वचा कोरडी दिसते.
आठवड्यातून १–२ वेळा हलका स्क्रब किंवा AHA/BHA असलेले केमिकल एक्सफोलीएंट वापरा. हे मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेचा नवा ग्लो मिळतो. परंतु जास्त स्क्रबिंग टाळा, अन्यथा त्वचा संवेदनशील होऊ शकते.
त्वचेची ओलसरता टिकवण्यासाठी हायल्युरॉनिक ऍसिड किंवा एलोवेरा असलेले मॉइश्चरायझर वापरा. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्रीम निवडा कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड आणि तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड मॉइश्चरायझर उत्तम.
सकाळी बाहेर पडण्याआधी SPF ३०+ किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन वापरा.
घरात असताना देखील सूर्यकिरणांपासून संरक्षण मिळावे म्हणून सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन C सीरम त्वचेचा टोन सुधारतो आणि नैसर्गिक ग्लो वाढवतो. घरगुती फेस मास्कसाठी मध, दही, हळद, गुलाबजल किंवा चंदन पावडर वापरू शकता. हे त्वचेला पोषण देतात व चमक वाढवतात.
दररोज ८–१० ग्लास पाणी प्या, झोप पूर्ण घ्या आणि ताजे फळे-भाज्या खा. गाजर, पपई, बेरीसारखी अँटीऑक्सिडंटयुक्त फळे त्वचेसाठी सर्वोत्तम असतात. तिखट व तळलेले पदार्थ टाळा, कारण ते त्वचा डल व तेलकट बनवतात.
दिवाळी किंवा लग्नाच्या एक दिवस आधी हायड्रेटिंग मास्क लावा आणि चेहऱ्याला हलका मसाज करा.यामुळे रक्ताभिसरण सुधारते व चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.सणाच्या दिवशी हलका मेकअप करा जेणेकरून तुमचा नैसर्गिक ग्लो अधिक खुलून दिसेल.