Shruti Vilas Kadam
डॉक्टरांच्या मते, भृंगराज, अकरोड आणि काळे तिळ या तीन घटकांचा एकत्र वापर केल्यास केस गळने कमी होते नियंत्रण मिळवता येते. रोज रात्री गरम पाण्यासोबत हे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते.
भृंगराजला “केशराज” म्हणजेच केसांचा राजा म्हटले जाते. हे केसांची मुळे मजबूत करतात, टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि नव्या केसांची वाढ वाढवते.
अकरोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, बायोटिन आणि व्हिटॅमिन ई असतात, जे केसांना आतून पोषण देतात. त्यामुळे केस मुलायम, दाट आणि चमकदार बनतात.
काळ्या तिळांमध्ये आयरन, झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात. तसेच ते केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवतात.
भृंगराज पानं वाळवून त्याची पावडर करा. त्यात अकरोड आणि काळे तिळ यांची पावडर मिसळा. हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा आणि दररोज एक चमचा गरम पाण्यासोबत घ्या.
हा उपाय नैसर्गिक असला तरी वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
अनेक लोकांनी हा उपाय वापरून चांगला फरक जाणवला आहेत. यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती कमी करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसतो.