राणू मंडल पुन्हा चर्चेत Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: राणू मंडल पुन्हा चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल

राणू मंडलच्या नावाने प्रमोशन होत असलेलं हे गाणं यूट्यूबवर तुफान व्हायरल होत आहे. 9 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं आतापर्यंत पाहिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एखादी व्यक्ती रातोरात सोशल मीडियामुळे लोकप्रिय होऊ शकते अथवा लोकप्रियतेच्या शिखरावरून जमिनीवर येऊ शकते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राणू मंडल. राणू मंडलला तिच्या गायन कौशल्यामुळे हिमेश रेशमियाने आपल्या सोबत गाण्याची संधी दिली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर गाणं मागून भीक मागणाऱ्या राणूला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र, राणूला आपली लोकप्रियता सांभाळता आली नाही. परिणामी राणूवर पुन्हा रेल्वे स्टेशनवर गाणं गाण्याची वेळ आली. असे असले तरी देखील राणू कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. राणू मंडलच्या नावाने प्रमोशन होत असलेलं हे गाणं यूट्यूबवर तुफान व्हायरल होत आहे. 9 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं आतापर्यंत पाहिलं आहे.

सध्या राणूचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. छठ पूजेचे हे गाणे व्हायरल होत आहे. सध्या बिहार आणि बंगालच्या काही भागामध्ये छठ पूजेचा सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात या सणाचे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहेत. अशातच राणू मंडलचा आवाज असल्याचे सांगून एक गाणं व्हायरल तुफान झालं आहे. मात्र, व्हायरल झालेलं गाणं राणूच्या आवाजातील नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे. व्हिडीओच्या कव्हर फोटोवर राणू मंडल चं नाव का वापरले गेले? असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT