सिनेपत्रकार अनिता पाध्ये यांनी एका कार्यक्रमाला मुलाखत दिली.
या मुलाखतीदरम्यान त्यांनी रंजना देशमुख यांची आठवण सांगितली.
अनिता पाध्ये यांनी रंजना यांच्या अपघाताबद्दल खुलासा केला.
Ranjana Deshmukh News : सत्तर आणि ऐंशी या दशकामध्ये मराठी सिनेसृष्टीमध्ये रंजना देशमुख या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. सहजसुंदर अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती. गुपचूप गुपचूप, बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार अशा अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. कारकीर्दीच्या शिखरावर असताना एका अपघातामुळे रंजना यांचे आयुष्य उद्धव झाले. या अपघाताबाबत सिनेपत्रकार अनिता पाध्ये यांनी नुकताच खुलासा केला.
झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रंजना कारने बंगळुरूला निघाल्या होत्या. रस्त्यात रंजना यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये त्यांचा जीव वाचला. पण दुर्देवाने त्यांचे दोन पाय निकामी झाले आणि हात गंभीररित्या जखमी झाला. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिता पाध्ये यांनी रंजना यांची आठवण सांगताना अपघातबाबत माहिती दिली.
अनिता पाध्ये बऱ्याचदा रंजना यांच्यासोबत असायच्या, त्यामुळे त्यांना रंजना देशमुख यांच्याबाबत जवळून जाणून घेता आले. 'सिनेमाच्या शूटिंगला जाताना तिचा (रंजना) अपघात झाला. अपघातात तिचा हात गळून पडला होता, म्हणजे १०-१२ फुटांवर पडला होता सरकत सरकत तिने तो हात आणला होता', असा खुलासा अनिता पाध्ये यांनी मुलाखतीमध्ये केला.
'तिला अपघाताच्या नंतर बघणं त्रासदायक होतं. तिचा चेहरा जसाच्या तसा होता. तिच्या चेहऱ्याला काहीच झालं नव्हतं. पण तिचं शरीर पॅरलाईज्ड झालं होतं. तिच्यावर चार ऑपरेशन झाली. तिच्या घरी कॉर्डलेस फोन होता, तो तिच्या कानाला लावायला पाच मिनिटं लागायची. माझ्याशी अशोक मामांबाबत ती नेहमी बोलायची. रंजूताई खूप जिद्दी होती. ती नाटकातून परत आली, पण व्हिलचेअरवर बसून. एवढी सुंदर अभिनेत्री पण तिचं असं व्हावं हे क्लेशदायक होतं', असे अनिता पाध्ये म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.