Ranbir Kapoor Take Break  Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Take Break: रणबीर कपूर घेणार अभिनयातून ब्रेक, स्वत: अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Ranbir Kapoor Interview: नुकतंच रणबीर कपूरने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेण्याची माहिती अभिनेत्याने स्वत: मुलाखतीतून दिली आहे.

Chetan Bodke

Ranbir Kapoor Take Break

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ची घोषणा झाल्यापासून जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, रणबीर कपूरचा चित्रपटातला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या रणबीरचे प्रेक्षकांच्या भेटीला एकामागून एक चित्रपट येताना दिसत आहेत. ‘ॲनिमल’ नंतर रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपटही येणार आहे. अशातच त्याने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेण्याची माहिती अभिनेत्याने स्वत: मुलाखतीतून दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतंच रणबीर कपूरने ‘झूम’ वेबपोर्टलसोबत संवाद साधला होता. यावेळी रणबीरने त्याच्या रियल लाईफसह रिल लाईफबद्दल भाष्य केले आहे. लवकरच रणबीर अभिनयातून सहा महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. रणबीर लवकरच लेक राहासाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे. लग्नानंतर वर्षभरातच रणबीर- आलियाने लेक राहाचं धुमधडाक्यात स्वागत केलं. रणबीरने मुलाखतीमध्ये आपल्या लेकीसोबतचे बॉन्डिंग चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

दरम्यान रणबीर कपूरने मुलाखतीमध्ये सांगितले, “ मी ‘ॲनिमल’नंतर पुढील काही महिने नव्या सिनेमामध्ये दिसणार नाही. मी आता माझे सर्व लक्ष लेक राहाकडेच देणार आहे. राहाचा जन्म झाल्यानंतर मी शुटिंगमध्ये व्यग्र होतो, म्हणून मला तिच्यासोबत गुड टाईम स्पेंड करता आला नाही. त्यामुळे मुलीसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी मी लवकरच ६ महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. राहा आता गुडघ्यावर रांगत असून, ती हळूहळू बोलायलाही लागली आहे. ती प्रचंड धमाल मस्ती करत असून ती आता ‘मा’ आणि ‘पा’ असे शब्दही बोलायला लागली आहे.” असं त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.

रणबीरच्या कामाबद्दल सांगायचे तर, गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर ‘तू झुठी मै मक्कार’ या चित्रपटामध्ये दिसला होता. येत्या १ डिसेंबरला रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

SCROLL FOR NEXT