Ranbir Kapoor Speak Had Quit Smoking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor On Quit Smoking: ‘रामायण’बद्दल रणबीर कपूर जरा स्पष्टच बोलला, धूम्रपान सोडण्याबद्दलही अभिनेत्याने केलं भाष्य

Ranbir Kapoor Ramayana Film: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीर कपूरने ‘रामायण’साठी मांसाहार आणि मद्यपान सोडल्याची चर्चा होत होती. आता त्याने आपल्या भूमिकेबद्दल स्वतःच स्पष्ट केले आहे.

Chetan Bodke

Ranbir Kapoor Speak Had Quit Smoking

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक पौराणिक चित्रपटांची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी अनेक चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याने आगामी चित्रपटासाठी मांसाहार आणि मद्यपान सोडल्याची चर्चा होत होती. आता त्याने आपल्या भूमिकेबद्दल स्वतःच स्पष्ट केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्याने आपल्या भूमिकेबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे. त्याने ‘झूम’ वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भूमिकेविषयी सांगितले. “हा चित्रपट फार मोठा आहे. त्यामागे सर्वांनाच खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या तरी काहीच ठरलेलं नाही. मला आशा आहे की, लवकरच चित्रपटाबद्दल तुम्हाला सर्वांना कळेल. मी सुद्धा चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी ऐकतोय, पण चित्रपटाला मी होकार दिलेला नाही.”

पुढे रणबीरने मुलाखतीमध्ये सांगितले, “मी ‘ॲनिमल’च्या शेवटच्या सीनसाठी केस कापले होते. सध्या मी माझे केस वाढवत आहे. मी कोणत्याही चित्रपटावर काम करत नाही. त्यामुळे मी कोणताही डाएट फॉलो करत नाही. खाण्याबद्दल ज्या गोष्टी माझ्या समोर येत आहेत. त्या मी खात आहे. माझी सर्वच जीवनशैली मी बदलली आहे. मी धुम्रपान करणे सोडलं असून त्यासाठी मी भरपूर चॉकलेट खात आहे.” असं त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.

एकंदरितच रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित ‘ॲनिमल’चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर सह दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपट येत्या १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’ चित्रपटाविषयी सांगायचे तर, चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर केजीएप स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT