Alia Bhatt and Sai Pallavi Instagram
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Movie: 'रामायण'मधून आलिया भट बाहेर; साई पल्लवी साकारणार सीतेची भूमिका, शूटिंग लवकरच सुरु होणार

Nitesh Tiwari Ramayan: नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे.

Pooja Dange

Ranbir Kapoor Will Play Ram In Next Movie:

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट 'रामायण'ची गेले काही महिने चर्चा होती. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटामध्ये रणबीर कपूर रामाची तर आलिया भट सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. परंतु आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. तर या चित्रपटामध्ये रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी 'सीता' साकरणार आहे. दाक्षिणात्या सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऑस्कर विजेती व्हीएफएक्स कंपनी 'DNEG' सोबत बोलणं सुरू केलं आहे. तसेच सुत्रांनी असेही सांगितले आहे की, नितेश तिवारी चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर जास्त फोकस करणार नाहीत.

चित्रपट समीक्षकांचे म्हणणे होते की, ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये फक्त व्हीएफएक्सवर लक्ष देण्यात आले होते. म्हणूनच कदाचित नितेश तिवारी चित्रपटाच्या व्हीएफएक्सपेक्षा चित्रपटाच्या कथेवर जास्त फोकस करणार आहेत. (Latest Entertainment News)

रणबीर कपूर आणि साई पल्लवी पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रायलॉगीच्या पहिल्या भागात राम आणि सीता यांची कथा दाखविण्यात येणार आहे. असे असले तर चित्रपटाच्या पहिल्या भागात यशचे काही सीन्स असतील. दुसऱ्या भागात मात्र यश म्हणजे रावणाचे भरपूर सीन्स असतील.

जेव्हा 'रामायण' चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग संपेल तेव्हा यशला शूटिंगसाठी बोलावले जाईल. यश जुलै २०२४ ला 'रामायण' चित्रपटातील (Movie) त्याच्या पात्राचे शूटिंग पूर्ण करेल. हे तिन्ही कलाकार लूक टेस्टमध्ये यशस्वी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT