Ramayana Film Shooting Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Film Shooting Update: रणबीर कपूर ‘रामायण’च्या शूटिंगला केव्हापासून सुरुवात करणार?; चित्रपटाबद्दल ३ अपडेट, वाचा सविस्तर

Ramayana Film Shooting Update: गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. अशातच, चित्रपटाबद्दल अनेक महत्वाच्या अपडेट्स समोर आलेल्या आहेत.

Chetan Bodke

Ramayana Film Shooting Update

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या रणबीर ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच तो या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर हा चित्रपट एकूण तीन भागांमध्ये रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे. पण याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. (Bollywood)

गेल्या काही दिवसांपूर्वी लारा दत्ता आणि अरूण गोविलचे मालिकेतील काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. त्यासोबतच सेटवरीलही अनेक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. तेव्हापासून दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी सर्वांनाच सेटवर मोबाईल नेण्यासाठी नकार दिला होता. पण या शुटिंगमध्ये अजून तरी रणबीर कपूर सामील झालेला नाही. रणबीर कपूरची शूटिंग केव्हापासून सुरू होणार ?, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेत्याच्या शूटिंगबद्दल नवे अपडेट समोर आले आहे. सध्या अभिनेता अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. भाला फेक, तिरंदाजी अशा अनेक गोष्टींचे तो सध्या प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षकांसोबत तो सध्या प्रशिक्षण घेत आहे. (Social Media)

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभु श्री रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, मुकुट कपूर नावाच्या एक्स युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 'रामायण' चित्रपटासंदर्भात एक अपडेट त्याने दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "निर्माते चित्रपटाबद्दल कथानकात कोणताही बदल करणार नाहीत. वास्तविक, जे काही आपण 'रामायण'मध्ये पाहिले आहे, ते सर्व चित्रपटात दाखवले जाईल. 'आदिपुरुष' चित्रपटासारखे आम्ही कोणतेही बदल करणार नाहीत." (Bollywood Film)

त्या युजरने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, " 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी केलेल्या चुका 'रामायण'चे दिग्दर्शक आणि निर्माते करू इच्छित नाहीत. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत खूप सुंदर दिसत होती. यादरम्यान अभिनेत्रीने रणबीर कपूरसमोर स्वत:ला खूप छान सादर केले. लक्ष्मणच्या भूमिकेत रवी दुबे या व्यक्तिरेखेसाठी एकदम परफेक्ट आहे. रणबीर कपूरने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे." नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात टॉलिवूड स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. तो चित्रपटामध्ये आपले पैसे गुंतवणार आहे. अद्याप याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. रामनवमीच्या मुहूर्तावर निर्माते मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

Buldhana : महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणूक; सीड्स उत्पादन करणेसाठी दिलेले बियाणे निघाले दुसऱ्या जातीचे

Maharashtra Live News Update : शाहरुख खानला मोठा दणका समीर वानखडे यांची याचिका स्वीकारली

SCROLL FOR NEXT