Salman Khan House Firing Case: 'अस्वस्थ करणारी घटना, आमचं संपूर्ण कुटुंब हादरलं', गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

Arbaaz Khan Post On Salman Khan Home Firing Case: या गोळीबारानंतर प्रथमच खान कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.
Salman Khan Galaxy Apt Firing
Salman Khan Galaxy Apt FiringSaam Tv

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायरिंग केले. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे सलमान खानच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अनेक स्टार्स आणि राजकारणी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले आहेत.

सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी याला सलमान खानने केलेला पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. गोळीबार प्रकरणावर सलमानचे कुटुंब आणि त्याचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. या गोळीबारानंतर प्रथमच खान कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

गोळीबाराच्या घटनेवर सलमान खानचा भाऊ अरबाज खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. अरबाजने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'आमच्या कुटुंबाचा पोलिसांवर विश्वास आहे आणि ते त्यांना तपासात सहकार्य करत आहेत. तसेच या घटनेचे वर्णन अस्वस्थ करणारे आहे.' पोस्टमध्ये अरबाजने लिहिले की, 'गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची नुकतीच घडलेली घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे.'

अभिनेत्याने पुढे लिहिले की, 'दुर्दैवाने आमच्या कुटुंबाच्या जवळ असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक मीडियामध्ये बेताल वक्तव्ये करत आहेत आणि म्हणत आहेत की हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कुटुंबावर त्याचा परिणाम होणार नाही. हे खरे नाही. खान कुटुंबाने या घटनेबाबत मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य केलेले नाही.'

अरबाज खानने पुढे लिहिले की, 'सध्या कुटुंब या घटनेच्या तपासात पोलिसांना मदत आणि सहकार्य करत आहे. आम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आमच्या कुटुंबाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ते त्यांच्या सामर्थ्याने सर्वकाही करतील असे आश्वासन देण्यात आले आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.' , असे म्हणत अरबाज खानने मुंबई पोलिसांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

Salman Khan Galaxy Apt Firing
Salman Khan Home Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा कट पूर्वनियोजितच होता; तपासातून बरेच खुलासे

दरम्यान, रविवारी दुपारी अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन सलमान खानबद्दल एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगमधील एका सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटचा आयपी अड्रेस कॅनडामध्ये असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

ते फेसबुक अकाऊंट हल्ल्याच्या काही तासांपूर्वी उघडण्यात आलं होतं. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून पोलिस संबंधित प्रकरणी सखोल तपास करत आहे. त्याचसोबत मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. याआधी सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती.

Salman Khan Galaxy Apt Firing
Salman Khan Galaxy Apartment: कोट्यवधींची संपत्ती, तरीही राहतो छोट्याशा फ्लॅटमध्ये; सलमान खाननं स्वत:च केला होता खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com