Ranbir Kapoor Ramayana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Ramayana: 'कुछ तो लोग कहेंगे...'; 'रामायण' चित्रपटावरुन ट्रोल करणाऱ्यांना रणबीर कपूरने दिलं सडेतोड उत्तर

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटातील भगवान रामाच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर टीका होत आहे. यावर रणबीरने १८ हजार विद्यार्थ्यांसमोर ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे.

Shruti Vilas Kadam

Ramayana: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या बहुचर्चित चित्रपटात रणबीर भगवान श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. मात्र, चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रणबीरच्या सिलेक्शनबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी भगवान रामच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आता या टीकेवर रणबीरने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग

रणबीरच्या सिलेक्शनबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच दसऱ्याला झालेल्या एका कार्यक्रमात 'सच्चाई और अच्छाई की जीत होगी' च्या ऐवजी 'अंत सच्चाई और अच्छाई का होगा' असे म्हटले होते. त्यावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

'कुछ तो लोग कहेंगे...' म्हणत ट्रोलर्सना उत्तर

नुकताच रणबीर कपूरने भारतातील १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला 'रामायण' चित्रपटावरून होत असलेल्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रणबीर म्हणाला, "आजच्या काळात ऑनलाइन ट्रोलिंग नावाची एक नवीन गोष्ट समोर आली आहे. हे अगदी जुन्या गाण्यासारखे आहे. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'. असे म्हणत मी ट्रोलिंगवर लक्ष देत नसल्याचे म्हटले.

कलाकारांची मोठी फौज

रामायण पार्ट १ हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल, अरुण गोविल, लारा दत्ता, रवी दुबे, इंदिरा कृष्णन, शीबा चड्ढा, कुणाल कपूर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, अजिंक्य देव, चेतन हंसराज, फैसल मलिक, विवेक ओबेरॉय आणि आदिनाथ एम. कोठारे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

SCROLL FOR NEXT