Ranbir Kappor and Neetu Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीर कपूर आणि नीतू कपूर गणेश आरतीत तल्लीन, व्हिडिओ झाला तूफान व्हायरल

रणबीर कपूर आई नीतू कपूर सोबत बाप्पाच्या निरोपपूर्वीची पूजा करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून पहिल्यादांचा रणबीर आणि अलिया हे कपल मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत.

'ब्रह्मास्त्र' हा बिग बजेट चित्रपट आहे. जवळ जवळ आठ वर्षे या चित्रपटावर काम सुरू होते. लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. टिझरमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या लूकमुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीरने स्वत:ला पूर्ण झोकून दिल आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सव सणांची रणधुमाळी असताना रविवारी मुंबईतील गणपती विर्सजनासाठी रणबीर कपूर हजर राहिला होता. याचदरम्यानचा रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अभिनेता रणबीर कपूर गणपती विर्सजनास उपस्थित असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आई नीतू कपूर सोबत दिसत आहे. रणबीर बाप्पाच्या निरोपपूर्वीची पूजा करताना दिसत आहे. रणबीरने काळा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली आहे. तर आई नीतू कपूरने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. शिवाय रणबीरने पारंपारिक पध्दतीने ओवाळणी करताना टोपी घातली आहे. व्हिडिओमध्ये रणबीर आणि नितू कपूर दोघेंही आरती करताना दिसत आहेत.

नुकताच नीतू कपूर 'जुग जुग जियो' या चित्रपटात दिसल्या होत्या. चित्रपटात नीतू कपूरसह वरूण धवन, कियारा अडवाणी आणि मनीष पॉल यांच्याही मुख्य भूमिका होत्या. करण जोहर दिग्दर्शित 'जुग जुग जियो' चित्रपट चांगलाच गाजला. तर रणबीर कपूरचा आगामी 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासह संदीप रेड्डी दिग्दर्शित आगामी 'एनिमल' चित्रपटात रणबीर,रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. याशिवाय रणबीर दिग्दर्शक लव रंजनच्या रोमांटिक-कॉमेडी चित्रपटात देखील दिसणार आहे. मात्र आता 'शमशेरा' या चित्रपटानंतर 'ब्रह्मास्त्र' मध्ये रणबीर काय जादू करतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT