Ranbir Kapoor Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Viral Video: फोटो काढणाऱ्या पापाराझीला ढकलत लिफ्टमध्ये घेऊन गेला, रणबीर कपूरच्या त्या व्हिडीओनं वेधलं सर्वांचं लक्ष

Ranbir Kapoor Video: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या एका वागणुकीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Ranbir Kapoor News

रणबीर कपूर बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. रणबीर जितका अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच त्याच्या कृत्यांमुळेही चर्चेत असतो. सध्या अभिनेता त्याच्या एका वागणुकीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो त्याच्या कारमधून उतरतो आणि थेट लिफ्टमध्ये जातो. लिफ्टमध्ये जात असताना, त्याच्या रस्त्यात एक पापाराझी येतो, त्याला बाजुला न करता त्यालाही तो थेट लिफ्टमध्येच नेले आहे. पापाराझी रणबीरचा व्हिडीओ शूट करत होता, त्याचे फोटो आणि व्हिडीओ शूट करताना तो थेट त्याला लिफ्टमध्ये नेतो. बुधवारी संध्याकाळी रणबीर कॅमेऱ्यामध्ये मुंबईमध्ये स्पॉट झाला. त्याचे हे कृत्य पाहून नेटकरी त्याच्यावर हसत आहेत. (Social Media)

यावेळी त्याने टीशर्ट आणि जीन्स असा लूक केला होता. तो त्याच्या कारमधून उतरताच त्याला पापाराझींनी घेरले आहे. यावेळी तो जरा चिडला होता, पण आपल्या चेहऱ्यावर त्याने स्मितहास्यच कायम ठेवले आहे. यावेळी त्याच्या चेहेऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे तर काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे. एक युजर म्हणतो, हाहाहा कमाल आहे. तर आणखी एक म्हणतो, कशाला उगाच त्याला किडनॅप करतो. असाच तुझा मस्तीखोर स्वभाव राहुदे.

रणबीर कपूर नुकताच मुंबईमध्ये परतला आहे. तो पत्नी आलियासोबत दिल्लीला राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यालाही गेला होता. आलियासह त्याच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे तर, रणबीर कपूरसह चित्रपटामध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. असून ‘ॲनिमल’ चित्रपट थिएटरमध्ये १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १,६२,९०० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

SCROLL FOR NEXT