Ramayana SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana : 'रामायण'चा तिसरा भागही येणार? रणबीर कपूरच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण | VIDEO

Ramayana Part 3 Update : 'रामायण' चित्रपटाचे मोठ्या उत्साहात प्रमोशन सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने चित्रपटाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे 'रामायण' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Maskar

रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होणार

'रामायण' चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई

'रामायण' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची सोशल मीडियावर चर्चा

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळत आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि 'रामायण' चित्रपटाची टीम चित्रपटाचे दमदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशात 'रामायण'चे कलाकार अनेक मिडिया मुलाखती देत आहेत. अशात रणबीर कपूरने एक मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर 'रामायण'च्या तिसऱ्या पार्टची चर्चा चांगलीच रंगली आहे.

'रामायण' पार्ट ३ येणार?

रामायणाचे दोन भाग बनणार हे आधीच घोषित करण्यात आले होते. पण आता रणबीरने नुकतेच असे काही म्हटले आहे ज्यामुळे तिसऱ्या भागाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 'रिव्ह्यू नेशन'शी बोलताना रणबीर म्हणाला, "मी दुसऱ्या भागाचे ५० टक्के काम आधीच पूर्ण केले आहे. आम्ही अजूनही चित्रीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. दुसरा किंवा तिसरा भाग (जर तो असेल तर) पूर्ण झाल्यावरही, मला नाही वाटत की ही गोष्ट आम्हाला कधी सोडून जाईल. परिणाम काहीही असो, ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. ही करिअर घडवणारी गोष्ट नाही, तर आयुष्य घडवणारी गोष्ट आहे."

सोशल मीडियावरील चर्चा

रणबीर कपूरचे हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणबीरच्या वक्तव्यानंतर, लोक विचारत आहेत की रामायणाचा तिसरा भाग येणार आहे का? अनेकांच्या मते रणबीरने एक मोठा स्पॉइलर दिला आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या 'रामायण' पार्ट ३ ची घोषणा झाली नाही.

'रामायण' चित्रपट

'रामायण' पार्ट १ चे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्मिते नमित मल्होत्रा आहेत. 'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे एकूण बजेट ४००० कोटी रुपये आहे.'रामायण' पार्ट १ दिवाळीत ५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Fort : डोंगरात कोरलेल्या पायऱ्या, खोल दऱ्या अन् २२५० फूट उंचीचा अद्भुत सुळका; मुंबई-पुण्याजवळ वसलाय खतरनाक ट्रेकिंग स्पॉट

Maharashtra : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! २०२६-२७ मध्ये परीक्षा शुल्क माफ; सरकारकडून नवे नियम जाहीर

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; सुरुवातीच्या निकालांत रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट

Maharashtra News Live Update : दुष्काळाचा फटका! बाजारात जनावरांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली

भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ४ घातक वेगवान गोलंदाजांना संधी, कुलदीप-सिराज बेंचवरच, पाहा प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT