Shruti Vilas Kadam
सनी देओल पुन्हा एकदा दमदार अॅक्शन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सूर्या' हा क्राइम थ्रिलर चित्रपट असून यामध्ये सनी देओलचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळणार आहे. २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'काली खेती' हा रुरल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. भीती, कुटुंब आणि भूतकाळातील रहस्यमय सत्य याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शरद केळकर, नेहा सरगम हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. २० नोव्हेंबरला सनी देओलच्या 'सूर्या'सोबत हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
आयुष्मान खुराना पहिल्यांदाच सूरज बडजात्या आणि राजश्री प्रॉडक्शन्ससोबत काम करत आहे. हा कौटुंबिक रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत शर्वरी अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना 'मायसा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दमदार कथा आणि भावनिक नाट्य असलेल्या या चित्रपटाची आयुष्मान खुरानाच्या 'ये प्रेम मोल लिया'सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
इमरान हाश्मी आणि जेनेलिया देशमुख पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. 'गनमास्टर G9' हा सस्पेन्स आणि अॅक्शनने भरलेला थ्रिलर चित्रपट आहे. २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
श्रद्धा कपूर 'ईठा' या चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्यावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षाचा आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाचा प्रवास यामध्ये पाहायला मिळणार आहे.
२०२६ चा शेवट शाहरुख खानच्या 'किंग' या चित्रपटाने होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन दिसणार आहेत.