raha birthday 
मनोरंजन बातम्या

Raha Birthday Bash: रणबीर-आलियाने केला राहाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा; आजी-आजोबांसोबत अनेक स्टार्सही उपस्थित

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लाडकी मुलगी राहा दोन वर्षांची झाली आहे. काल बुधवार 06 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेबी राहाच्या वाढदिवसानिमित्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काल रात्री 6 नोव्हेंबर रोजी एक मोठी पार्टी दिली. राहाचे आजी-आजोबा सोनी राजदान आणि महेश भट्ट या पार्टीत सहभागी झाले होते. तसेच त्याचवेळी, आजी नीतू कपूर देखील आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त जमले होते. याशिवाय अनेक फिल्म स्टार देखील पार्टीत उपस्थित होते.

लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट् यांनीही पार्टीत हजेरी लावली. बर्थडे पार्टीत महेश भट्ट लहान मुलासारखे झाले. त्याचा फोटो मोठी मुलगी पूजा भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये महेश भट्ट पार्टीमध्ये एन्जॉय करताना आणि कार्टूनमध्ये पोज देताना दिसत आहेत.

Mahesh Bhatt

तिच्या खास दिवशी, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये राहा खूपच क्यूट दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. राहाच्या वाढदिवशी नीतू कपूरने आलिया, रणबीर आणि राहा यांचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये राहा दोघांच्यामध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतूने लिहिले की, 'आज आमच्या प्रेमाचा वाढदिवस आहे. देव तुम्हाला उदंड आशीर्वाद देवो.

रिद्धिमाने राहाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तिने इन्स्टा स्टोरीवर तिची मुलगी समरा आणि राहा यांचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे आमच्या गोड लहान परी. आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करतो.

riddhima kapoor

अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर आलिया आणि रणबीर कपूरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. आलियाने लग्नानंतर दोनच महिन्यांत आई होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलियाने मुलगी राहाला जन्म दिला. ख्रिसमसच्या निमित्ताने या जोडप्याने पहिल्यांदाच मुलगी राहाचा चेहरा पापाराझींना दाखवला.

Written By: Dhanshri Shintre.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT