Rana Daggubati Reveals Rs 400 Crore Was Borrowed For Baahubali Film: बाहुबली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक बिगबजेट चित्रपट. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर, परदेशातही दमदार कमाई करत अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले. चित्रपटात प्रभास आणि राणा डग्गुबातीची या दोघांची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली. नुकताच भल्लालदेवची भूमिका साकारलेल्या राणा डग्गुबातीने चित्रपटाविषयी काही खुलासे केले आहे.
इंडिया टुडे या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राणा डग्गुबातीने सांगितले, “एस. एस. राजामौली यांनी बँकेकडून चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ४०० कोटींचे कर्ज घेतले होते. तीन चार वर्षांपूर्वी चित्रपटासाठी कुठे जास्त पैसे होते? निर्माते त्यावेळी चित्रपटासाठी घर किंवा त्यांची खासगी मालमत्ता बँकेत गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घ्यायचे. त्याकरिता निर्माते बँकेला २४ ते २८ टक्के व्याज देत होते. बाहुबलीसारख्या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बँकेकडून थेट ३०० ते ४०० कोटी रुपयांचच कर्ज घेतलं होतं.” (Bollywood Film)
राणा डग्गुबती पुढे मुलाखतीत म्हणतो, “ ‘बाहुबली’ साठी निर्मात्यांनी बँकेकडून १८९ कोटींचे कर्ज घेतले होते. निर्मात्यांनी साडेपाच वर्षांच्या परतफेडीसाठी कर्ज घेतले. १८९ कोटींच्या कर्जासाठी बँकेने २४ टक्क्याने व्याजदर दिला होता. सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या चित्रपटावर निर्मात्यांनी दुप्पट पैसा खर्च केला होता. कसलीच परवा न करता निर्मात्यांनी व्याजाच्या पैशांवर दुसऱ्या भागातील काही सीन्स शूट केले होते. निर्मात्यांनी चित्रपटावर पैसे खर्च करताना आणि कर्ज घेताना, हा चित्रपट किती कोटींची कमाई करेल आणि किती नाही, याचा काहीच विचार केला नव्हता.” (Bollywood Actor)
चित्रपटाच्या पहिल्या भागाने ५०० कोटींच्या आसपास कमाई केली होती, तर दुसऱ्या भागाने तब्बल १३०० कोटींच्या आसपास कमाई केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी केले असून चित्रपटाचे आजही सर्वत्र कौतुक होते. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.