Ramayana Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याची वर्णी, साकारणार महत्त्वाची भूमिका

Chetan Hansraj In Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. टिव्ही गाजवणारा अभिनेता चित्रपट दिसणार असून तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Shreya Maskar

'रामायण' चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे.

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'रामायण'मध्ये प्रसिद्ध टिव्ही अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बहुप्रतीक्षित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाचे मोठे अपडेट समोर आले आहेत. या चित्रपटात अजून एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. या अभिनेत्याने आजवर हिंदी मालिका, चित्रपटात काम केले आहे. 'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे.'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे.

'रामायण' चित्रपटात अभिनेता चेतन हंसराज (Chetan Hansraj) पाहायला मिळणार आहे. नुकताच त्याच्या भूमिकेचा खुलासा करण्यात आला आहे. चेतन हंसराज रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'रामायण' चित्रपटात रावणाचे आजोबा सुमालीची भूमिका साकारणार आहेत. 'रामायण' चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रणबीर कपूरचा देखील सर्वात मोठा चित्रपट असणार आहे.

एका मिडिया मुलाखतीत चेतन हंसराजने सांगितले की, "'रामायण' चित्रपटाची कथा त्याच्या भूमिकेपासून सुरू होते. माझे 'रामायण'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'रामायण' माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. शूटिंगचा अनुभव खूप चांगला होता. प्रत्येक व्यक्ती उत्तम आहे. चित्रपटात 'सुमाली'ची त्याची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची आहे. सेटवरील हॉलिवूड टेक्निशियन्स चित्रपटाचा स्केल पाहून आश्चर्यचकित झाले. हे आतापर्यंतचे माझ्या आयुष्यातील सर्वांत शानदार शूटिंग आहे. कारण मी पूर्वी असे कधीही केले नव्हते. "

'रामायण' रिलीज डेट

'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'रामायण' चित्रपटात साऊथ अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. रवि दुबे लक्ष्मणची भूमिका तर शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहे.

'रामायण' चित्रपट कधी रिलीज होणार?

पहिला भाग 2026

'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका कोण करणार?

साऊथ अभिनेता यश

सनी देओल 'रामायण' मध्ये कोणती भूमिका साकारणार?

हनुमान

'रामायण'चे दिग्दर्शक कोण?

नितेश तिवारी

चेतन हंसराज 'रामायण' मध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार?

रावणाचे आजोबा सुमाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

SCROLL FOR NEXT