Resham Kaur Passed Away : गायक हंसराज हंस यांच्यावर दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

hansraj hans wife death : गायक हंसराज हंस यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पत्नी रेशम कौर यांचं निधन झालं आहे.
Resham Kaur Passed Away
hansraj hans wife death :Saam tv
Published On

प्रसिद्ध गायक आणि माजी खासदार हंसराज हंस यांची पत्नी रेशम कौर यांचं निधन झालं आहे. रेशम या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आजारी असल्याने जालंधरच्या टागोर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात रेशम कौर यांनी शेवटचा श्वास घेतला. रेशम कौर यांनी बुधवारी दुपारी १ वाजता अंतिम श्वास घेतला. गायक हंस यांच्या पत्नी या हृदयाशी संबंधित आजाराशी त्रस्त होत्या.

Resham Kaur Passed Away
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या भावाने घेतली अजित पवारांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली?

रेशम कौर यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या तब्येतीवर फारसा परिणाम झाला नाही. रेशम कौर यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. दलेर मेहंदी यांची मुलगी अजित कौर हिचं लग्न रेशम-हंसराज यांचा मुलगा नवराज हंसशी झालं आहे.

Resham Kaur Passed Away
Mumbai Local : लोकलच्या डब्यातून अचानक निघाला धूर; रेल्वे सेवा विस्कळीत होताच प्रवाशांची स्टेशनवर गर्दी, धडकी भरवणारा VIDEO

१६ दिवसानंतर म्हणजे १८ एप्रिल रोजी रेशम आणि गायक हंसराज हंस यांच्या लग्नाचा होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या आधीच रेशम यांनी जगाचा निरोप घेतला. रेशम यांच्या मृत्यूची वार्ता कळताच हसंराज यांच्या घरी लोकांच्या भेटीगाठी वाढल्या.

Resham Kaur Passed Away
Mhada Lottery : म्हाडाच्या नव्या घरांची लॉटरी कधी निघणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

कधी होणार अंत्यसंस्कार?

मीडिया रिपोर्टनुसार, रेशम कौर यांचा भाऊ परमजीत सिंह यांनी सांगितलं की, रेशम यांचं निधन आज दुपारी १ वाजता झालं. मागील ५ दिवसांपासून रेशम या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्याआधी त्यांची तब्येत ठीक होती. मात्र, त्यांची अचानक तब्येत बिघडली. काही दिवसाआधी त्यांना पहिल्यांदा हार्टअॅटक आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचं आज निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी ११ वाजता शफीपूर येथे अंत्यसंस्कार केले जातील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com